नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपला सर्वात शक्तिशाली टी-90 भीष्म टँक पूर्व लडाखमध्ये तैनात केला आहे. या वृत्तानंतर चीनला मोठा धक्का बसला आहे. आता चीनकडून अक्साई चीनचा भाग गमवण्याची भीती निर्माण होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत घाबरलेल्या चीनने एलएसीवर आपले सैन्य वाढवले आहे. दरम्यान, अशीही बातमी येत आहे की भारताने देखील लडाखमध्ये आर्मीचे तीन डिविजनच तैनात केले आहे.
अक्साई चीन हा भारताचा भाग आहे, पण सध्या तो चीनच्या ताब्यात आहे. अक्साई चीन परत घेण्यासाठी भारताने देखील तयारी केली आहे. भारताच्या या तयारीमुळे चीन आता घाबरला आहे. अक्साई चीन गमवण्याच्या भीतीने चिनी सैनिकांची संख्या आणखी वाढवण्यात आली आहे. त्याला उत्तर म्हणून भारताने लडाख सीमेवर आपली तिन्ही विभागांची सेना तैनात केली आहे.
चीन सीमेवर आणखी जवानांना तैनात करत असताना सोबत भारत आपली ताकदही वाढवत आहे. १९६२ ला लडाख सीमेवर जिथे फक्त १ ब्रिगेड (२००० जवान) होती. तिथे आता ३ डिविजन तैनात आहेत. म्हणजेच सुमारे 45 हजार सैनिक. डोंगराळ भागात प्रमाण १:१२ असतं. कारण जो वरच्या भागावर असतो. तो अधिक ताकदवर असतो. म्हणजेच येथे १ सैनिक हा १२ सैन्याच्या बरोबरीचा असतो. म्हणजेच आता भारताचा सामना करण्यासाठी चीनला या ठिकाणी ५ लाख सैन्य तैनात करावे लागेल.
गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी चीनने लडाखला केंद्र शासित प्रदेश बनवल्यामुळे आक्षेप घेतला होता. अक्साई चीन मार्गे तिबेटहून शिंजियांग प्रांतात जाण्याचा हा सोपा मार्ग आहे. पण जर हा मार्ग नसेल तर काराकोरम रेंजमधून जावे लागेल. जर भारत अक्साई चीनकडे वाटचाल करत असेल तर चीन केवळ अक्साई चीनच नाही तर झिनजियांग प्रांत देखील गमावू शकतो.
अक्साई चीन कुठे आहे?
- केंद्रशासित प्रदेश लडाखचा भाग आहे
- काराकोरम पर्वतांच्या मधला भाग
- समुद्रसपाटीपासून 17 हजार फूट उंची
- काश्मीरच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे 20% क्षेत्र
- क्षेत्रफळ सुमारे 38 हजार चौरस किलोमीटर
- चीनने अक्साई चीन अवैधपणे ताब्यात घेतला आहे.
अक्साई चीन वाद म्हणजे काय?
- अक्साई चीन लडाखचा भाग आहे
- क्षेत्रफळ 37,244 किमी
- चीनने अक्साई चीनवर घुसखोरी करुन ताबा मिळवला.
- 1947 नंतर चीनने घुसखोरी सुरू केली.
- 1957 मध्ये चीनने रस्ता बनवला.
- 1958 मध्ये चीनने हा भाग आपल्या नकाशामध्ये दाखवला
- युद्धानंतर 1962 मध्ये चीनने यावर ताबा घेतला.
- 1963 - पाकिस्तानने चीनला अक्साई चीन दिला.