मुस्लिमांना लक्ष्य केल्याच्या इम्रान यांच्या आरोपाला भारताकडून असे उत्तर

इम्रान खान यांचा आरोप भारताने फेटाळला

Updated: Apr 20, 2020, 08:31 AM IST
मुस्लिमांना लक्ष्य केल्याच्या इम्रान यांच्या आरोपाला भारताकडून असे उत्तर title=

नवी दिल्ली : कोरोना वायरस प्रकरणात मुस्लिमांना जाणिवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला होता. हा आरोप भारताने फेटाळून लावत इम्रान यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

पाकिस्तानचे नेतृत्व वायफळ विधान करुन पाकिस्तानच्या आंतरिक मुद्द्यांवरुन जनतेचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले. 

भारतात कोरोना वायरसच्या संकटात मुस्लिम समुदायाला निशाणा बनवले जात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी लगावला. याला भारताच्या परराष्ट्र विभागाने उत्तर दिले. कोरोनाचे मुळापासून उच्चाटन करण्याऐवजी आमचे शेजारी (पाकिस्तानी नेतृत्व) आधारहीन आरोप लावत असल्याचे परराष्ट्र विभागाने म्हटले. 

इम्रान यांच्या आरोपावर त्यांना माध्यमांतर्फे प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.  ज्यांच्याबरोबर ते वास्तवात भेदभाव केला जातो त्यांनी आपल्याकडच्या अल्पसंख्यांक समुदायाची काळजी घ्यावी, असा सल्ला  अल्पसंख्यांकांच्या बाबतीत पाकिस्तान नेतृत्वाला देण्यात आला.