चीनच्या रणनितीला जशाच तसे उत्तर देणार भारत, वाचा 'प्लान ७३'

 भारत -चीन सीमेवर दोन्ही देशांत वाढत्या तणावावर नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाय करीत आहे. भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीन वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत आहे. कधी सरकारी मीडिया तर कधी दुसऱ्या पद्धतीने भारताला इशारे देत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 19, 2017, 05:45 PM IST
 चीनच्या रणनितीला जशाच तसे उत्तर देणार भारत, वाचा 'प्लान ७३'  title=

नवी दिल्ली :  भारत -चीन सीमेवर दोन्ही देशांत वाढत्या तणावावर नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाय करीत आहे. भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीन वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत आहे. कधी सरकारी मीडिया तर कधी दुसऱ्या पद्धतीने भारताला इशारे देत आहे. 

 
 चीन आपल्या सेनेला भारतीय सीमेच्या जवळ येण्यासाठी सतत रस्त्यांची निर्मिती करत आहे. भारतीय सेनेकडून चीनच्या रस्ते बांधणीला विरोध करण्यात आला. त्यामुळे दोन्ही देशांच्या सेनेत एक महिन्यांपासून तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील वाढता तणाव पाहात भारताने आपल्या रणनितीत बदल केला आहे. चीनच्या रणनितीला जशास तसे उत्तर देत भारताने नव्या प्लानची तयारी केली आहे. 
 
 भारत असे अनेक उपाय करीत आहे, त्यामुळे चीनला रोखले जाऊ शकते. नव्या योजने अंतर्गत भारत चीनशी लागून असलेल्या सीमेवर ७३ रस्ते बनविण्याची तयारी आहे.  यापूर्वी भारताने अशी रणनिती केली होती की सीमावर्ती भागात निर्मनुष्य भाग असल्याने तेथून भारतात घुसणे अवघड झाले असते. पण आता प्लान चेंज करण्यात आला आहे. 
 
 गेल्या काही वर्षांपासून चीन भारतीय सीमाभागाच्या जवळच्या परिसरात रस्ते बांधणी करत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी भारताने दाखवली आहे. गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत यासंदर्भात माहिती देताना सांगितले की,  सध्यान चीनच्या सीमावर्ती भागात ४६ रस्त्यांचे काम सुरू आहे. तसेच अजून २७ रस्ते संरक्षण मंत्रालय बांधणार आहेत.  यातील ३० रस्त्यांचे काम पूर्ण होत आले आहे.