India-China Clash : गलवान खोरं चीनचंच, चीन पुन्हा बरळलं

तुम्ही सैनिकांना ताब्यात ठेवा......   

Updated: Jun 17, 2020, 09:28 PM IST
India-China Clash : गलवान खोरं चीनचंच, चीन पुन्हा बरळलं  title=
छाया सौजन्य- एएनआय

बिजिंग : IndiavsChina भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये हिंसक झप झाल्यानंतर चीनकडून सातत्यानं काही कांगावे करण्यात आले. तणाव विकोपाला गेलेला असतानाही चीनकडून त्यांची भूमिका मात्र बदलल्याचं दिसत नाही आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते Zhao Lijian यांनी देशाच्या भूमिका मांडल्या. 

Galwan Valley गलवान खोरं हे कायमच चीनचं होतं, असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. भारताकडूनच वारंवार सीमा मुद्द्यावरील नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचा कांगावा यावेळी चीनकडून करण्यात आला. सध्याच्या घडीला भारतीय सैन्यानं सीमारेषेवरील जवानांना ताब्यात ठेवत उद्युक्त करणाऱ्या कारवाया बंद करण्याची विचारणा केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

चर्चा आणि विचारविनिमयाच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपली तयारी चीननं दाखवली. यामध्ये भारतानं गलवान मुद्द्यावर एकतर्फी निर्णय घेऊ नये या भूमिकेवरही चीन वारंवार येत असल्याचं दिसून आलं. तेव्हा आता चर्चा आणि संवादाच्या बळावर गलवान खोऱ्याची हिंसक झडप आणि चीनसोबत असणाऱ्या सीमावादाच्या मुद्द्यावर नेमका कोणता निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

 

चीनला धडा शिकवण्यासाठी भारताकडे हे ५ पर्याय, ड्रॅगनला झुकण्यास भाग पाडण्याचा इशारा !

 

भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये १५-१६ जूनच्या रात्री लडाखच्या Galwan Valley गलवान खोऱ्यात अतिशय हिंसक झडप झाली. यामध्ये भारतीय जवान शहिद झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं. ज्यानंतर देशात बऱ्याच हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं. भारत- चीन सीमेवर वाढलेला तणाव पाहता उत्तराखंड, लाहौल स्पिती या भागातही हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.