भारताचे चांद्रयान देणार जपानच्या मून लँडर स्लिमला जीवनदान! असा आहे ISRO चा प्लॅन

Japan Moon Lander Slim : भारत, रशिया, अमेरिका आणि चीनचे यान चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहेत. जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. जपानच्या यानाने पहिला फोटो पृथ्वीवर पाठवला आहे.   

वनिता कांबळे | Updated: Jan 25, 2024, 04:12 PM IST
 भारताचे चांद्रयान देणार जपानच्या मून लँडर स्लिमला जीवनदान! असा आहे ISRO चा प्लॅन  title=

Japan Moon Mission : जापानच्या स्मार्ट लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले असले तरी मून मिशन धोक्यात आले आहे. जपानच्या स्मार्ट लँडर बसवण्यात आलेले सोलर पॅनल ऊर्जा निर्माण करण्यास ठरत आहेत. यामुळे जपानचे मून मिशन धोक्यात आले आहे. मात्र, आता  भारताचे चांद्रयान  जपानच्या मून लँडर स्लिमला (Japan Moon Lander Slim) जीवनदान देणार आहे. यासाठी ISRO जबरदस्त प्लान बनवला आहे. यामुळे जपानच्या मून मिशनला पुन्हा एकदा आशेचा किरण सापडला आहे. 

5 महिन्यानंतर जापानच्या स्मार्ट लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग

07 सप्टेंबर 2023 रोजी  मून लँडर स्लिम चंद्राकडे झेपावले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून H-IIA रॉकेटद्वारे या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. 19 जानेवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड झाले आहे.  तब्बल 5 महिन्यानंतर जापानच्या स्मार्ट लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. चंद्रावर यशस्वी लँंडिंग झाले असले तरी जपानचे मून मिशन धोक्यात आले आहे. 

जपानच्या मून लँडर स्लिमचे अचूक लँडिंग

जपानच्या मून लँडर स्लिमचे अचूक लँडिंग झाले आहे.  जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा निश्चित केली होती. निश्चित जागेवरच हे यान लँड झाले.  जपानी स्पेस एजन्सी JAXA ने लँडिंगसाठी 600x4000 किमी जागा निवडली होती. या जागेत 100 मीटरच्या आतच या यानाने अचूक लँडिंग केले आहे. चंद्रावरील शिओली क्रेटर या जागेवर जपानचे हे यान लँड झाले.  

जपानच्या मून लँडर स्लिमला भारताच्या चांद्रयानची मदत 

जपानच्या मून लँडर स्लिमला जीवनदान देण्यासाठी भारताच्या चांद्रयानची मदत घेतली जात आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA आणि भारतीय अंतराळ संस्था अर्थात ISRO यांच्यात चर्चा सुरु असल्याची माहिती नासाचे वैज्ञानिक स्‍कॉट टिली यांनी दिली आहे. भारताच्या चांद्रयान 2 ने कॅप्चर केलेल्या हाय क्वालीटी फोटोच्या मदतीने  जपानच्या मून लँडर स्लिमची पोजिशन बदलण्यासाठी प्लासिंग केली जात आहे. जपानच्या मून लँडर स्लिमच्या लँंडिगवेळी देखील   चांद्रयान 2 च्या डेटाची मदत घेण्यात आली होती. 

लँडरच्या बॅटरीत तांत्रिक बिघाड

जपानच्या मून लँडर स्लिमवर बसवण्यात आलेल्या सोलर पॉवर सेलमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. सोलर पॉवर पावर सप्लाय निर्माण करण्यास अकार्यक्षम ठरत आहे. सध्या हा लँडर बॅटरी मोडवर काम करत आहे. सोलर पॅनलच्या मदतीने बॅटरी चार्ज न झाल्यास पॉवर सप्लाय बंद होईल. यानंतर लँडरशी संपर्क साधता येणार नाही. पुरेसा सुर्यप्रकाश पडत नसल्याने सोलर पॅनल चार्ज होत नसल्याची माहिती समोर येत आहेत. हे यान चंद्राच्या शिओली क्रेटर जागेवर उतरले आहे. शिओली क्रेटर या जागे जागेला Mare Nectaris असेही म्हणातात. हा प्रदेश चंद्राचा समुद्र म्हणून ओळखला जातो. चंद्रावरील या जागेत खूप गडद अंधार असतो.  मून मिशनवर काम करणारी टीम हा तांत्रिक अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. सोलर पॅनलला पुरेशा सूर्य प्रकाश मिळावा यासाठी त्याची दिशा बदलली जाणार आहे. 6 सप्टेंबर रोजी जपानचे हे यान चंद्राकडे झेपावले. 25 डिसेंबर रोजी ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले. लँडिंगपूर्वी अनेक आठवडे लँडरच्या सिस्टमची सातत्याने चाचणी केली जात होती. चांद्रयान 2 च्या डेटाच्या मदतीने आता पुढचे नियोजन केले जात आहे.  XRISM च्या मदतीने चंद्रावर वाहणाऱ्या प्लाज्मा लहरींचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे ब्रम्हांडात ताऱ्यांची निर्मिती कशी झाली. तसेच आकाशगंगा याचा अभ्यास हे यान करणार आहे.