क्रुरतेचा कळस... या देशात WhatsApp वापरल्यामुळे महिलांना केलं जातंय कैद

 परिस्थिती पाहून मन पिळवटून जात आहे... 

Updated: Oct 13, 2021, 10:12 AM IST
क्रुरतेचा कळस... या देशात  WhatsApp वापरल्यामुळे महिलांना केलं जातंय कैद  title=

बीजिंग : चीनमध्ये मुस्लिमांवरील  (Muslims in China) होणाऱ्या अत्याचाराबाबत एक नवा खुलासा समोर आला आहे. एका पुस्तकात असे म्हटले आहे की, चीनचे कम्युनिस्ट सरकार मुस्लिम महिलांना (Muslim Women) व्हॉट्सअॅप  (WhatsApp)  वापरल्याबद्दल ताब्यात घेत आहेत. सरकार द्वारा या महिलांना  प्री-क्रिमिनल्स म्हटलं जातं. यापूर्वीही चीनची मुस्लिमविरोधी विचारधारा अनेक वेळा उघड झाली आहे. चीनमध्ये  उईगर मुसलमान नागरिकांना मोठ्या प्रमामात अत्याचारांचा सामना करावा लागतो.  

एक नवं पुस्तक 'In The Camps: China's High-Tech Penal Colony' मध्ये चीनच्या सर्व कृत्यांचा खुलासा करण्यात आला आहे.  वॉशिंग्टन विद्यापीठाची विद्यार्थिनी वेरा झोउच्या प्रकरणाचे उदाहरण या पुस्तकात दिले आहे. वेराला नुकतेच तिच्या शाळेचे Gmail अकाउंट वापरल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले.

चीनमधील शिनजियांग येथे विद्यार्थ्यीनीने तिचा गृहपाठ दाखविण्यासाठी Gmail अकाउंट उघडले होते. बिझनेस इनसाइडरमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, वेरा झोउने सांगितले की तिला ताब्यात घेतल्यानंतर तिला रि-एज्यूकेशन वर्गात पाठवले जात असल्याचे सांगितले गेले.  त्यानंतर वेरा कित्येक दिवस कैदेत होती. 

2018 मध्येही वेराने नवीन वर्ष कैदेत घालवले. वेरा झोऊ सुमारे 6 महिने कैदेत राहत होती. या पुस्तकात वेरा झोउ व्यतिरिक्त 11 इतर मुस्लीम महिलांचा उल्लेख आहे. ज्यांना पोलिसांनी व्हॉट्सअॅप वापरल्याबद्दल ताब्यात घेतले आहे.