Corona संकटात या देशाने केली भारताला पाठिंबा देण्याची घोषणा

कोरोना संकटात हा देश भारताच्या मदतीसाठी आला पुढे

Updated: Apr 23, 2021, 07:53 PM IST
Corona संकटात या देशाने केली भारताला पाठिंबा देण्याची घोषणा title=

नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे एका दिवसात तीन लाखाहून अधिक प्रकरणे नोंदविली जात आहेत. भारत सरकार व्यतिरिक्त इतर देशांच्या सरकारांनाही वाढत्या संक्रमणाची चिंता आहे. भारतातील कोरोनाचा अनियंत्रित वेग आणि इथल्या बर्‍याच रुग्णालयांमध्ये बेडची स्थिती पाहता एकीकडे अनेक देशांनी भारतीय प्रवाशांवर बंदी घातली आहे. तर काही देश भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. ब्रिटनने भारताला ‘रेड लिस्ट’ मध्ये टाकलं आहे. फ्रान्सने भारताहून येणाऱ्या लोकांना 10 दिवस क्वांरटाईन राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण सोबतच फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी भारताला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, "संकटाच्या या काळात फ्रान्स आपल्या पाठीशी उभा आहे, असा संदेश मला भारतीय जनतेला पाठवायचा आहे." आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यास तयार आहोत'. फ्रान्स देखील कोरोना विषाणूमुळे बाधित आहे. रण फ्रान्समध्ये भारतासारखी परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही.

भारतात कोरोना आजार भयानक रूप धारण करीत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या 24 तासांत भारतात 3,32,730 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 2,263 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यानंतर देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 1,62,63,695 झाली आहे आणि मृतांची संख्या 1,86,920 वर गेली आहे.

शुक्रवारी सकाळी आठ वाजता संक्रमणाची ही आकडेवारी नोंदविण्यात आली आहे. आज सलग दुसरा दिवस आहे जेव्हा देशात 24 तासांत 3 लाखाहून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. अमेरिकेनंतर संक्रमणाच्या बाबतीत भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे.