'काश्मीरसाठी कोणत्याही थराला जाऊ'; इम्रान खान यांची पोकळ धमकी

जी-७ शिखर संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल ट्रम्प यांची भेट झाली.

Updated: Aug 26, 2019, 08:58 PM IST
'काश्मीरसाठी कोणत्याही थराला जाऊ'; इम्रान खान यांची पोकळ धमकी title=

इस्लामाबाद : जी-७ शिखर संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल ट्रम्प यांची भेट झाली. या भेटीनंतर काश्मीरचा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला अंतगर्त प्रश्न असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे चांगलेच खवळले आहेत. भारतासारखीच पाकिस्तानकडेही अण्वस्त्र असल्याची पोकळ धमकी इम्रान खान यांनी दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवून ऐतिहासिक चूक केल्याची दर्पोक्ती इम्रान खान यांनी केली आहे. आता काश्मीरबाबत निर्णय घेण्याची वेळ आल्याचंही इम्रान खान म्हणाले. इम्रान खान यांनी पाकिस्तानला संबोधून केलेल्या भाषणात ही बडबड केली आहे.

भारतासोबत जेव्हाही चर्चा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दहशतवादाचा आरोप होत असतो, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं. काश्मीरबाबत पाकिस्तान कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतो, असाही पोकळ दम भरण्याचा प्रयत्नही इम्रान खान यांनी केला. भारत आम्हाला दिवाळखोर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही इम्रान खान यांनी त्यांच्या भाषणात केला आहे.

जी-७ शिखर संमेलनाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना काश्मीर मुद्द्यावरून स्पष्ट संदेश दिला. 'आम्ही कोणत्याही देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये लक्ष देत नाही, त्यामुळे आमच्या अंतगर्त गोष्टींमध्ये दुसऱ्या कोणीही दखल द्यायचे कष्ट घेऊ नयेत,' असं मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान जी-७ परिषदेसाठी फ्रान्समध्ये आहेत. या परिषदेसाठी जी-७ गटाचे सदस्य नसलेल्या काही देशांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. यात भारताचाही समावेश आहे. या परिषदेमध्ये मोदी-ट्रम्प यांच्यात विविध प्रश्नांवर द्विपक्षीय चर्चा झाली आहे.

या गटाच्या सात देशांशिवाय भारत, ऑस्ट्रेलिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, सेनेगल आणि रवांडा या देशांच्या प्रमुखांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रेडो, जर्मिनीच्या चान्सलर अँजेला मार्केल, जवानचे पंतप्रधान शिंझो आबे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन आणि इतर नेते या परिषदेत आहेत.