पहिल्यांदाच चंद्रावर पाठवली मानवाची हाडं आणि DNA ; भारतीय व्यक्तीच्या नेतृत्वात NASA चं खास मून मिशन

नासाने आपल्या आगामी मूनमिशन अंतर्गत मानवी हाडं आणि काही व्यक्तींचे DNA नमुने चंद्रावर पाठवले आहेत. Peregrine Mission One असे या नासाच्या या खास मोहिमेचे नाव आहे. भारतीय वंशांची व्यक्तीच्या हातात या मिशनची धुरा आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 8, 2024, 11:52 PM IST
पहिल्यांदाच चंद्रावर पाठवली मानवाची हाडं आणि DNA ; भारतीय व्यक्तीच्या नेतृत्वात NASA चं खास मून मिशन title=

Peregrine Mission One: भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर अनेक देश मून मिशनची तयारी करत आहे. अमेरिकन अंतराळ संस्था अर्थात नासाने (NASA) तर पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्याची तयारी केली आहे. यासाठीच नासाने पेरेग्रीन मिशन वन (Peregrine Mission One) ही मोहिम हाती घेतली आहे. पेरेग्रीन मून लँडर अवकाशात झेपावले आहे. भारतीय वंशाची व्यक्ती नासाच्या या खास मून मिशनचं नेतृत्व करत आहे. ताशी 390 km वेगाने उडणाऱ्या पेरेग्रिन फाल्कन (Peregrine Falcon)  पक्षाच्या नावावरुन या लँडरला पेरेग्रीन मिशन हे नाव देण्यात आले आहे. 

नासाने 52 वर्षांपूर्वी 1972 मध्ये अपोलो-17 मोहिमेच्या माध्यामातून चंद्रावर पहिले पाऊल टाकले. नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्याची तयारी करत आहे. यासाठीच नासाने पेरेग्रीन मिशन वन मोहिम हाती घेतली आहे. पेरेग्रीन मून लँडर अवकाशात झेपावले. केप कॅनवेरल, फ्लोरिडा येथून या लँंडरचे लाँचिंग करण्यात आले. 23 फेब्रुवारी रोजी हे लँंडर चंद्रावर सॉफ्ट लँडिग करेल. लँडिंग केल्यानंतर, पेरेग्रीन लँडर 192 तास संशोधन करमार आहे. 

मानवी हाडांचे अवशेष लँडरसह चंद्रावर पाठवले

एका खाजगी कंपनीचे हे लँडर आहे.  अमेरिकेच्या खाजगी कंपनी अॅस्ट्रोबोटिकने हे लँडर तयार केले आहे. या लँडरवर नासाचे इन्स्ट्रुमेंट बसवण्यात आले आहेत. चंद्रावरील पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी हे लँंडर प्रक्षेपित करण्यात आले. या लँडरने गोळा केलेल्या डेटाच्या मदतीने  नासाच्या आगामी चंद्र मोहिमेतील आर्टेमिस मिशनचे नियोजन करणार आहे. पेरेग्रीन मून लँडर सोबत अनेक देशांनी आपले पेलोड पाठवले आहेत. याशिवाय मानवी हाडांचे अवशेष देखील या लँडर सोबत पाठवण्यात आले आहेत. या लँडरवर जगभरातून 80 हजार पेक्षा जास्त संदेश देखील पाठवण्यात आले आहेत. मानवी हाडांशिवाय काही निवडक मानवांचे डीएनए नमुनेही चंद्रावर पाठवले जात आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन, ड्वाइट आयझेनहॉवर आणि जॉन एफ. केनेडी यांच्या डीएनए नमुन्यांचाही यात समावेश आहे. एकूण 265 कॅप्सूल डीएनए नमुने चंद्रावर पाठवण्यात आले आहेत. तसेच पेलोडमध्ये माउंट एव्हरेस्टचे काही तुकडे देखील समाविष्ट आहेत. 

पेरेग्रीन मिशनची कमान कमान भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे

पेरेग्रीन मिशनची कमान कमान भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे आहे. भारतीय वंशाचे शरद भास्कर हे पेरेग्रीन मिशनचे नेतृत्व करत आहेत. शरद भास्करन हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. टेक्सास विद्यापीठातून त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बीएससी पदवी मिळवली. या चंद्र मोहिमेत चंद्रावर 20 पेलोड पाठवले जात आहेत. यातील पाच नासाचे, तर उर्वरित 15 पेलोड वेगवेगळ्या खासगी कंपन्यांचे आहेत.