लॉस एंजेलिस: अमेरिकेत घडलेल्या एका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुंता पोलिसांनी धक्कादायकरित्या सोडवला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीपर्यंत पोहोचायला पोलिसांना तब्बल ३० वर्षे लागली. विशेष म्हणजे वापरलेल्या कंडोममुळे पोलिसांना आरोपीबद्धल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच माहितीच्या आधारे आरोपी जॉन मिलर (वय ५९ वर्षे) याला अटक केली. ही घटना घडली तेव्हा, पीडिता ८ वर्षांची होती. केवळ कंडोमच्या आधारावर कसून तपास करत, बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुंता सोडवणे ही, कौतुकास्पद बाब मानली जात आहे.
पोलिसांनी घटनास्थळांवरून पीडितेचा मृतदेह फोर्ट वायने येथून ताब्यात घेतला होता. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, वापरून फेकलेले कंडोम आरोपीच्या घरापासून २००४ मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेतलेल्या या कंडोमची पोलिसांनी डीएनए चाचणी केली. या चाचणीचा अहवाल आला तेव्हा, पोलीस थक्क झाले. या अहवालानुसार कंडोममध्ये मिळालेले डीएनएचे नमुने आणि पीडितेच्या कपड्यांवर मिळालेल्या डीएनएच्या नमुन्यांशी मिळतेजुळते होते. कंडोमवरील मिळालेल्या डीएनएच्या आधारावरून संशोधक जॉन मिलर आणि त्याच्या भावावर बलात्कार आणि हत्येत सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
April Tinsley was murdered 27 yrs ago. Her mom hopes a new sketch based only on killer's DNA helps @NBCNightlyNews pic.twitter.com/482ZOiOi8q
— Kate Snow (@tvkatesnow) June 30, 2015
59 year old John D. Miller of Grabill, Indiana is behind bars tonight for the rape and murder of April Tinsley in 1988.
Tune into FOX 55 tonight for the full story. pic.twitter.com/BAQ0elx8Uk— FOX 55 Fort Wayne (@FOX55FortWayne) July 15, 2018
Here is the mobile home where John D. Miller said he raped and killed 8-year-old April Tinsley 30 years ago. MORE: https://t.co/OfIp7d5To7 pic.twitter.com/asoyg8wyr7
— NewsChannel15 (@wane15) July 15, 2018
प्राप्त अहवालानुसार, जॉन मिलरने वापरलेलेल तीन कंडोम पीडितेच्या जेनेटिक प्रोफाइलसोबत जुळले. न्यायालयात सुनावनीवेळी आरोपीने त्याच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांचा स्वीकार केला. सुनावनीवेळी पीडितेचे कुटुंबिय भाऊक झाले होते. दरम्यान, पोलिसांनी पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिची अंतरवस्त्रेही ताब्यात घेतली होती. त्या वस्त्रांवरील डीएनएवरून पोलीस तपास करत होते.