भारतामुळे हमासने केला इस्त्रायलवर हल्ला? जो बायडन यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, "माझ्याकडे पुरावा नाही पण..."

Joe Biden on Hamas Israel War : गेल्या काही दिवसांपासून सुरू असेल्या इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावर अमेरिकाचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी मोठं वक्तव्य केलंय. जो बायडन यांनी या युद्धाला भारताच्या ड्रीम प्रोजेक्टला (Middle East Economic Corridor) जबाबदार धरलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Oct 26, 2023, 05:05 PM IST
भारतामुळे हमासने केला इस्त्रायलवर हल्ला? जो बायडन यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, "माझ्याकडे पुरावा नाही पण..." title=
Joe Biden on Hamas Israel War, Middle East Economic Corridor

Middle East Economic Corridor : इस्रायल-हमासच्या युद्धाला (Israel Hamas War) आज 20 वा दिवस उजाडलाय. इस्रायलची लढाऊ विमाने हमासवर सातत्यानं बॉम्बफेक करत आहेत. या युद्धात आतापर्यंत 6 हजार जणांचा बळी गेलाय. गाझामध्ये 5 हजारहून जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर इस्रायलमध्ये मृत्यूचा आकडा 1400 वर गेलाय. हमास इस्रायल युद्धात हजारो नागरिकांचा बळी गेलाय. 11 कोटी 4 लाख नागरिक स्थलांतरीत झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रानं दिलीय. सर्वाधिक गाझा पट्टीतील नागरिक जगभरात स्थलांतरीत झाल्याचं स्थलांतर एजन्सीनं म्हटलंय. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी धक्कादायक दावा केला आहे. हमास आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धासाठी जो बायडन यांनी भारताच्या ड्रीम प्रोडेक्टला (Middle East Economic Corridor) जबाबदार धरलंय.

काय म्हणाले जो बायडन?

हमासने इस्रायलवर दहशतवादी हल्ला करण्याचे एक कारण म्हणजे नवी दिल्लीतील G-20 परिषदेदरम्यान महत्त्वाकांक्षी भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरची अलीकडेच केलेली घोषणा आहे, असं जो बायडन यांनी म्हटलं आहे. मला खात्री आहे की, हमास आणि इस्रायल यांच्यातील तणावाच्या कारणांपैकी एक हे कारण देखील आहे. माझ्याकडे याबाबत कोणताच ठोस पुरावा नसल्याचं जो बायडन यांनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे आता भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर परिणाम होणार का? असा सवाल आता विचारला जात आहे. जो बायडन यांनी पहिल्यांदाच नव्हे तर मागील आठवड्यात देखील असंच वक्तव्य केलं होतं. 

दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करण्याची रणनिती आखलीय. लेबनॉनमध्ये हमास, हिज्बुल्लाह आणि इस्लामिक जिहादी कमांडर यांच्यात बैठक झालीय. या बैठकीत इस्रायलवर जोरदार हल्ले करण्याची रणनिती आखण्यात आलीय. इस्रायली सैनिक गाझा पट्टीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. या सैनिकांना केवळ पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. हल्ल्याची तारीख कॅबिनेमध्ये ठरणार आहे. इस्रायल नागरिकांची सुटका करून हमासचा खात्म करणं हेच लक्ष्य असल्याचं नेत्यानाहू यांनी सैनिकांना सांगितलंय.

आणखी वाचा - इस्त्रायलमध्ये 'या' खास जॉबसाठी भारतीयांची सर्वात जास्त डिमांड; 4 वर्षांचा व्हिसा पण मिळतो

इस्रायलवर हल्ला करण्यासाठी इराणमध्ये 500 दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा द वॉल स्ट्रीट जर्नलनं केलाय. इराणच्या इस्लामिक रिवाल्युशनरी गार्ड कोर्पसनं दहशतवाद्यांना खडतर प्रशिक्षण दिलं. त्यानंतर 7 ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी हल्ला चढवला, असाही दावा द वॉल स्ट्रीट जर्नलकडून करण्यात आला.