Guinness Book: आठवड्यातील 'हा' दिवस असतो त्रासदायक! गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

आठवड्यातील सात दिवसांचं महत्त्व आहे. रविवार ते शनिवार असा आठवडा असतो. सोमवार ते शुक्रवारपर्यंत कामाचे दिवस असतात. तर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस लोकं विकेंड मूडमध्ये जातात. त्यामुळे प्रत्येकाला सुट्टी हवीहवीशी असते. कारण या दिवशी टेन्शन फ्री राहाता येतं. नुकतंच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book) आठवड्यातील एका वाराची वाईट दिवस म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

Updated: Oct 17, 2022, 06:30 PM IST
Guinness Book: आठवड्यातील 'हा' दिवस असतो त्रासदायक! गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद title=

Guinness Book Of World Records: आठवड्यातील सात दिवसांचं महत्त्व आहे. रविवार ते शनिवार असा आठवडा असतो. सोमवार ते शुक्रवारपर्यंत कामाचे दिवस असतात. तर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस लोकं विकेंड मूडमध्ये जातात. त्यामुळे प्रत्येकाला सुट्टी हवीहवीशी असते. कारण या दिवशी टेन्शन फ्री राहाता येतं. नुकतंच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book) आठवड्यातील एका वाराची वाईट दिवस म्हणून नोंद करण्यात आली आहे. हा वार दुसरा तिसरा कोणताही नसून सोमवार (Monday) आहे. विकेंडनंतर येणारा हा वार सर्वात वाईट असल्याचं सांगण्यात येत आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सोमवारीच ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'आम्ही सोमवारची आठवड्यातील सर्वात वाईट दिवस म्हणून नोंद करत आहोत.' वास्तविक सोमवार हा शनिवार आणि रविवारनंतर येतो. म्हणजेच दोन सुट्ट्यांनंतर येतो. या दिवशी लोकांना ऑफिस किंवा इतर कामाच्या ठिकाणी जाण्यात आळस जाणवतो. इतकेच नाही तर अनेक वेळा सोशल मीडियावर लोकं लिहितात की, सोमवार हा सर्वात वाईट दिवस आहे. हे लक्षात घेऊन गिनीज बुकने याची नोंद केली आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं केलेल्या ट्विटनंतर जगभरातील ट्विटर युजर्सकडून प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहे. काही युजर्सने लिहिलं आहे की, गिनीज बुकने नेमका दिवस कोणता आहे हे सांगितले आहे. इतर काही लोकांनी लिहिलं आहे की, 'गिनीज बुकनं लोकांच्या मनातलं ओळखलं आहे.' असं असलं तरी गिनीज बुकने हे ट्विट केवळ मनोरंजनासाठी केले आहे आणि लोक याबाबत सहमत असल्याचे दिसत आहे.