Google देत आहे १ लाख रुपये जिंकण्याची संधी, बस्स तुम्ही हे करा काम !

Google Pay वर मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला १ लाख रुपये जिंकण्याची संधी आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 30, 2018, 10:06 PM IST
Google देत आहे १ लाख रुपये जिंकण्याची संधी, बस्स तुम्ही हे करा काम ! title=

मुंबई : इंटरनेट क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी गूगलने आपल्या डिजिटल पेमेंट अॅप  Google Pay वर मोठी घोषणा केलेय. १८ सप्टेंबरला या अॅपला लाँच होऊन वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने तुम्हाला १ लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.

google pay offers users golden chance to win rs 1 lakh reward

यानिमित्त १८  सप्टेंबरपर्यंत या अॅपवर पाच व्यवहार केल्यास पाच रुपयांपासून १ लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. 

google pay offers users golden chance to win rs 1 lakh reward

गुगलने Google Pay च्या वर्षपूर्तीनिमित्त ऑफर्स जाहीर केली आहे. यामध्ये एकूण ५ कोटींची बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठविणे, दुकानदाराला कॅश मोडमध्ये पैसे देणे, दुकानदाराच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविणे आणि गूगल पे (तेज) युपीआय आयडीच्या युजर्सना पैसे पाठविणारे युजर्स या ऑफरमध्ये पात्र होणार आहेत.

google pay offers users golden chance to win rs 1 lakh reward

ऑफरकाळात एका यूजरला एकदाच बक्षीस मिळणार आहे. त्यासाठी पैसे पाठवणाऱ्याकडे गूगल पे चे अपडेट व्हर्जन असायला हवे. 

google pay offers users golden chance to win rs 1 lakh reward

गूगल पे हे अॅप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) द्वारे बनविल्या गेलेल्या यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआई) सिस्टीमवर आधारित आहे. 

google pay offers users golden chance to win rs 1 lakh reward

१८  सप्टेंबरच्या सकाळी ९ वाजेपर्यंत यासाठी व्यवहार करावे लागणार आहेत . या ऑफरसाठी केवळ गूगल पेच्या अॅपवरून दुसऱ्याबाजुच्या पे अॅपवर व्यवहार करणारेच पात्र ठरणार आहेत. 

google pay offers users golden chance to win rs 1 lakh reward