या देशात लग्नासाठी मुलींचं होतं अपहरण; तरीही गुन्हा होत नाही दाखल

  लग्न एक पवित्र बंधन आहे. 

Updated: Aug 9, 2021, 01:04 PM IST
या देशात लग्नासाठी मुलींचं होतं अपहरण; तरीही गुन्हा होत नाही दाखल title=

नवी दिल्ली : जगातील प्रत्येक कोपऱ्यात अशा अनेक प्रथा आहेत, ज्या आजही पाळल्या जातात. आताच्या जगात लग्न करण्यासाठी एका देशात चक्की मुलींचं अपहरण केलं जातं. इंडोनेशियाच्या ग्रामीण भागात आजही तीनपैकी एका मुलीचं लग्नासाठी अपहरण केलं जातं. सर्वांना माहिती आहे, लग्न एक पवित्र बंधन आहे. वेग-वेगळ्या धर्मांमध्ये लग्नाच्या वेगळ्या प्रथा असतात. लग्न करण्यासाठी मुलगा आणि मुलगी दोघांची मंजुरी महत्त्वाची असते. 

पण इंडोनेशियामध्ये लग्न करण्यासाठी मुलगा मुलीचं अपहरण करतो. पण तरी देखील त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही. इंडोनेशियाच्या 'सुंबा' नावाच्या टापूवर ही विवादास्पत परंपरा आजही सुरू आहे. जर मुलाला मुगली पसंत आली तर तो त्यामुलीचं अपहरण करतो आणि त्यानंतर तिच्यासोबत लग्न करतो. 

गेल्या अनेक दिवसांपासून ही पंरपरा मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या परंपरेला 'काविन टांगकाप' म्हणून ओळखलं जातं. ही परंपरा कधी सुरू झाली? कशी सुरू झाली? यावर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. यासाठी इच्छुक व्यक्ती आवडत्या मुलीचं मित्रांच्या मदतीने अपहर करू शकतो. 

अशाच एका विचित्र परंपरेबद्दल बोलताना, पश्चिम आफ्रिकेत राहणारी वोडाब्बा जमाती अशी आहे जिथे लग्नासंबंधी केलेल्या प्रथा सर्वांना आश्चर्यचकित करतात. याठिकाणी लग्नाआधी मुलांना दुसऱ्याच्या पत्नीला चोरावं लागतं.  अशा प्रकारे विवाह करणे ही या जमातीची ओळख आहे. पण यासाठी आधी कुटुंबाची परवानगी गरजेची असते.