मेट्रो स्टेशनवर या कपलसोबत असे काही झालं की सार्‍यांच्याच काळजाचा ठोका चुकला

आजकाल सोशल मीडियामध्ये एका चीनी कपलचा व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे.

Updated: Aug 31, 2017, 07:10 PM IST
मेट्रो स्टेशनवर या कपलसोबत असे काही झालं की सार्‍यांच्याच काळजाचा ठोका चुकला  title=

चीन : आजकाल सोशल मीडियामध्ये एका चीनी कपलचा व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे.

या व्हिडिओनुसार, एक यंग कपल मेट्रो स्टेशनवर एस्कलेटरने वर जात होते. पण ही दोघं वर जाणार इतक्यातच असे काही होते की तेथील सार्‍यांनाच धक्का बसतो. 
व्हायरल होणारा हा व्हिडिओ इतका थक्क करणारा आहे की, तेथील लोकल मीडियानेदेखील याचा वापर बातम्यांमध्ये केला आहे. ही घटना चीनमध्ये शेंजेन या शहरातील एका मेट्रो स्टेशनवर घडली आहे.

तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये ही घटना कैद झाली आहे. 

 

दोघेही या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत. सुरूवातीला सारेच ठीक आहे. पण क्षणांत सारे चित्र बदलते. एस्कलेटरच्या मदतीने वर जाताना मुलगा पायर्‍यांच्या दिशेने जातो. पण त्याची गर्लफ्रेंड तेथील एक टाईल (जमिनीचा भाग) खचल्याने आत जाते. हे पाहून आजूबाजुची लोकंही धावत आली. त्यानंतर मुलीला बचावण्यात यश आले. या मुलीला किरकोळ जखमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.