तुमची ऑर्डर डायरेक्ट दिसणार आभाळात, काय आहे नवीन तंत्रज्ञान..

पाहा व्हायरल झालेला हा व्हिडीओ

Updated: Oct 6, 2022, 06:19 PM IST
तुमची ऑर्डर डायरेक्ट दिसणार आभाळात,  काय आहे नवीन तंत्रज्ञान.. title=

मुंबई : आधुनिक युगात तंत्रज्ञानही झपाट्याने बदलत आहे आणि गोष्टी सोप्या होत आहेत. येणारा काळ सेवा पुरविण्याचा आहे हे देखील खरं आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी सिस्टीम याचाच एक भाग आहे. या एपिसोडमध्ये सौदी अरेबियातून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक माणूस मशिनच्या मदतीने हवेत उडत इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहोचल्याचे दिसत आहे. तो तिथे फूड डिलिव्हरी करण्यासाठी आला, असे सांगितले जात आहे. (Saudi Arabia Food Delivery System) 

आणखी वाचा : 'सामन्याच्या फक्त 1 दिवस आधी पत्नीसोबत...', सूर्यकुमार यादव केला खुलासा

वास्तविक, याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवर अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये आपल्याला दिसतं की, ती व्यक्ती उडत असताना एक माणूस इमारतीच्या एका मजल्यावर पोहोचला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सौदी अरेबियातील एक डिलिव्हरी एजंट जेवण पोहोचवण्यासाठी जेटपॅकवर उडतानाचा आहे. इतकंच नाही तर हा व्यक्ती एका मोठ्या पॅकेटमध्ये काहीतरी घेऊन जात असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

आणखी वाचा : ‘शाळेतील शिक्षकानं माझ्या अंतर्वस्त्रात…’, मुनमुन दत्तानं शेअर केला लैंगिक शोषणाचा धक्कादायक अनुभव

आणखी वाचा : 'मेरे हसबँड की शादी है' अभिनेत्रीचा मोठा खुलासा!

दरम्यान, त्या व्यक्तीने खबरदारी म्हणून हेल्मेट आणि इतर सुरक्षा उपकरणे देखील परिधान केली आहेत. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत सामानाची वाहतूक करत असल्याचे दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतरही अनेकांचा गोंधळ उडाला आहे. कारण सध्या असे तंत्रज्ञान खूप महाग आहे. (food delivery by man flying in air of saudi arabia viral on social media trending news) 

आणखी वाचा : ट्रान्सजेंडर गौरी सावंतचा संघर्ष येणार रुपेरी पडद्यावर

काही वापरकर्ते म्हणतात की होय हे तेच तंत्रज्ञान आहे. तर काही लोकांचा गोंधळ उडाला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. फूड इंडस्ट्रीतील कंपन्या आता फूड डिलिव्हरी पोहोचवण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत ही वस्तुस्थिती आहे. जिथे काही कंपन्या रोबो आणि ड्रोनच्या माध्यमातून फूड डिलिव्हरी करत आहेत. त्यामुळे या पद्धतीनेही फूड डिलिव्हरी सुरू असल्याची चर्चा आहे.