Jennifer Love: पैसे घेऊन पुरुषांचा अपमान करते ही महिला, 2 तासांची कमाई जाणून बसेल धक्का

UK News: ब्रिटनमधील एका सुपरस्टार वेबकॅम मॉडेलने पुरुषांचा अवघ्या दोन तासांसाठी अपमान केला. ज्यासाठी एका कंपनीने तिला लाखो रुपये दिले. ही एक दिवसाची नोकरी नाही तर अर्धवेळ दैनंदिन नोकरी आहे. ज्यामुळे युरोपमध्ये याचीच चर्चा होत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, ते जाणून घ्या.

Updated: Oct 6, 2022, 03:28 PM IST
Jennifer Love: पैसे घेऊन पुरुषांचा अपमान करते ही महिला, 2 तासांची कमाई जाणून बसेल धक्का title=

Online Bullying Jennifer Love: एक चांगली आणि विलासी जीवन जगण्यासाठी लोक विविध प्रकारची कामे करतात. पण काही लोक फक्त दोन तास काम करून इतके पैसे कमावतात की त्यांना महिनाभर 8 तासांची शिफ्ट करुनही कमाई करता येत नाही. अशीच कमाई करणाऱ्या ब्रिटनची सुपरस्टार मॉडेल जेनिफर लव्ह  (Jennifer Love) हिची चर्चा आहे. तिची कमाई जाणून घेतल्यानंतर सगळेच हैराण होत आहेत.

दोन तास काम, त्यानंतर दिवसभर विश्रांती

यूकमध्ये (UK)राहणारी 25 वर्षीय जेनिफर लव्ह (Jennifer Love)हिने उघड केले आहे की, ती फक्त दोन तास काम करून महिन्याला सुमारे 7.50 लाख रुपये सहज कमावते. जरी तिचे काम खूप विचित्र आहे. जेनिफर या सेवेमध्ये पुरुषांचा घोर अपमान करते. म्हणजेच 24 तास पुरुषांना शिव्या दिल्याबद्दल तिला खूप पैसे मिळतात, इतके की मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणार्‍यांचेही नशीब नसते.  सोशल मीडियावर तिच्याच कमाईच खूप चर्चा सुरु आहे. 

एकेकाळी वेटर होती, आता सुपरस्टार  

'वेल्स ऑनलाइन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नशीब कुणाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही.  वेटर म्हणून तिच्या पूर्वीच्या नोकरीत कनिष्ठांचे टोमणे आणि वरिष्ठ व्यवस्थापकांची निंदानालस्ती असूनही, जेनिफर आज संपूर्ण यूकेमध्ये स्वतःहून लोकप्रिय झाली आहे. लोक जेनिफरची सेवा घेण्याचा आनंद घेतात, म्हणजेच स्वतःचा अपमान करुन घेत असता. कदाचित त्यामुळेच तिच्या कमाईत वाढ होत आहे.

तिची अशी होते मोठी कमाई

दोन वर्षांपूर्वी जेनिफरच्या एका मित्राने तिला तिच्या सुंदर पायांचे फोटो ऑनलाइन विकण्याचा सल्ला दिला. यानंतर जेनिफर लव्हने 10-20 सेकंदांचे व्हिडिओ बनवून तासाला 5000 रुपये कमवायला सुरुवात केली. हळूहळू तिने ग्राहकांसाठी 5 मिनिटांचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, ज्यामध्ये ती त्यांच्या आरोग्याचा अपमान करत असे. आता लोकांचा अपमान करण्यात त्यांना किती आनंद मिळतो ते कळत नाही की, लोक तिच्यावर इतके पैसे खर्च करू लागले. ‘PayPig’ सेशन तिच्या कमाईचे साधन बनले. आम्ही तुम्हाला सांगतो की 'पेपिग सेशन' याला म्हणतात, ज्यामध्ये लोक पैसे देऊन स्वतःचा अपमान करुन घेतात आणि हा ट्रेंड युरोपमध्ये खूप प्रसिद्ध झाला आहे.