लिफ्टमध्ये भरलं गळ्यापर्यंत पाणी, मग आत अडकलेल्या मित्रांना असं काढलं बाहेर

त्यारात्री जोरदार पाऊस सुरु होता आणि तेव्हाच टोनी लू आणि त्याचे काही मित्र रात्री 10 च्या सुमारास लिफ्टमधून खाली येत होते.

Updated: Aug 10, 2021, 08:43 PM IST
लिफ्टमध्ये भरलं गळ्यापर्यंत पाणी, मग आत अडकलेल्या मित्रांना असं काढलं बाहेर title=

वॉशिंगटन : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडीओज समोर येत असतात. जे लोकांना आश्चर्यचकीत करतात, तर काही व्हिडीओमध्ये असं काही असतं जे पाहून लोकांना धक्का बसतो. सध्या अमेरिकेतील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधील दृश्य लोकांच्या अंगावर काटा उभा करणारं आहे. कारण या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, येथे लिफ्टमध्ये पाणी भरले आहे आणि त्यात लोकं देखील अडकले आहेत. हे पाणी इतकं आहे की, ते लोकांच्या गळ्यापर्यंत पोहोचलं आहे. त्यात लिफ्टचा दरवाजा उघडत नसल्याने हे प्रकरण जास्तच भयानक झाले.

ही घटना अमेरिकेतील ओमाहा, नेब्रेस्का येथे घडली. येथे पावसामुळे तुंबलेले पाणी लिफ्टच्या आत गेले, ज्यामुळे काही लोकं लिफ्टमध्ये पाण्यात अडकून पडली.

रिपोर्ट्सनुसार, त्यारात्री जोरदार पाऊस सुरु होता आणि तेव्हाच टोनी लू आणि त्याचे काही मित्र रात्री 10 च्या सुमारास लिफ्टमधून खाली येत होते. तेव्हा ही लिफ्ट लॉबीमध्ये येताच त्यामध्ये पाणी भरु लागले. हे पाहून लिफ्टमधील लोकांना काय करावे हे सुचले नाही.

नंतर लोकांनी वरच्या मजल्यावर जाण्याचा निर्णय घेतला, परंतु लिफ्ट संपूर्ण पाण्याने भरली असल्याने लिफ्टचं वजन जास्त झालं, ज्यामुळे ही लिफ्ट आता वर देखील जात नव्हती.

या लिफ्टमध्ये इतके पाणी होते की, आतील लोकांच्या गळ्यापर्यंत आले. टोनीने या घटनेचे व्हिडीओ इन्स्टाग्रामव शेअर केला आहे.

टोनीने सांगितले, 'जेव्हा आमच्या पोटाच्यावर पाणी येऊ लागले, तेव्हा आम्हाला काय होतंय हे कळत नव्हते' यानंतर टोनीने  सांगितले की, त्याने त्याच्या मित्रांना फोन केला आणि मदतीसाठी पोलिसांनाही फोन करुन बोलावले. नंतर त्याचे मित्र आले, त्यांनी लिफ्टचा दरवाजा मोठ्या मेहनतीने उघडला आणि लिफ्टमधील सर्वांचा जीव वाचवला.

त्या दिवशी पावसाचे पाणी इतके वाढले होते की, इतर लोकांनाही त्याचा खूप त्रास सहन करावा लागला. या फोटोमध्ये पाहिले जाऊ शकते की, एक कार पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे आणि काही लोकं आपला जीव वाचवण्यासाठी कारच्या वर बसले आहेत. ओमाहामध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली.