Omicron Variant : कोरोनाबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी. ओमायक्रॉननं पहिला बळी घेतला आहे. ब्रिटनमध्ये ओमायाक्रॉनमुळं पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीच ही माहिती दिलीय. ब्रिटनमध्ये रविवारी ओमायक्रॉनचे नवी 1 हजार 239 प्रकरणं नोंदवली गेली आहेत.
ओमायक्रॉन व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार होत असल्याने ब्रिटन सरकारने रविवारी देशातील अलर्ट पातळी तीनवरून चार केली आहे. यूकेमध्ये ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे. रविवारी, ओमायक्रॉनची 1,239 प्रकरणे नोंदवली गेली. यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सी (यूकेएचएसए) च्या सल्ल्यानुसार, इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडच्या सर्व भागांच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (सीएमओ) सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आपण विचार करत आहोत की हा विषाणू सौम्य आहे, तितका धोकादायक नाही, तर मला वाटतं आपण हा विचार आत्ताच सोडून द्यावा आणि सध्या गरज आहे ती बुस्टर डोस घेण्याची, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे.
British Prime Minister Boris Johnson said on Monday the first patient had died after contracting the #Omicron variant of the #coronavirus: Reuters
— ANI (@ANI) December 13, 2021
आणखी धक्कादायक म्हणजे ओमायक्रॉनमुळे एक एप्रिलपर्यंत इंग्लंडमध्ये तब्बल 75 हजार मृत्यू होऊ शकतील, अशी भीती वर्तवण्यात आली आहे. लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि दक्षिण अफ्रिकेतल्या के स्टेलनबोश यूनिव्हर्सिटीमधल्या संशोधकांनी हा अंदाज वर्तवला आहे. योग्य खबरदारी घेतली नाही तर इंग्लंडमध्ये रोजची रुग्णसंख्या दोन हजारांवर जाईल, अशी भीतीही वर्तवण्यात आलीय.