झुकरबर्गच्या आयुष्यात आली एक परी

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 29, 2017, 12:05 PM IST
झुकरबर्गच्या आयुष्यात आली एक परी  title=

फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गच्या आयुष्यात अजून एका परीचे आगमन झाले आहे. कन्यारत्नाचा लाभ झाल्याने तो सध्या आनंदात आहे.

आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन त्याने नुकतीच याची घोषणा केली. या पोस्टमध्ये झुकरबर्गने पत्नी प्रिसिला चॅन आणि दोन मुलींचा असा फॅमिली फोटोही शेअर केला आहे. 

या महिन्याच्या सुरूवातीलाच मुलीचा जन्म झाल्याने झुकरबर्गने तिचे नाव ऑगस्ट असे ठेवले आहे. 'ऑगस्ट'च्या येण्याने आम्ही खुप आनंदात असल्याचे त्याने सांगितले. 

झुकरबर्गने आपल्या तान्ह्या मुलीला एक खुले पत्र लिहिले आहे.

त्यात तो म्हणतो, डिअर ऑगस्ट या जगात तुमचे स्वागत आहे. तू मोठी होऊन कोण होशील याची उत्सुकता आम्हाला लागली आहे.