नवी दिल्ली : मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिम पाकिस्तानाच असल्याची माहिती समोर आल्यानंतर बऱ्याच चर्चा आणि हालचालींना वेग आल्याचंपाहायला मिळालं. पुन्हा एकदा दाऊदशी संबंधित अनेक गोष्टींबाबतची माहिती समोर येऊ लागली. यातच त्याच्या प्रेयसीबाबतही बरीच चर्चा झाली. ZEE NEWS च्या WORLD EXCLUSIVE गौप्यस्फोटातून ही बाब उघड झाल्याचं कळत आहे.
दाऊदच्या पाकिस्तानी प्रेयसीला अनेक नावांनी ओळखलं जातं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या प्रेयसीचं नाव आहे महविश हयात. तिचं वय आहे, ३७ वर्षे. ती मुळात एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. दाऊदपेक्षा महविश वयानं २७ वर्षे लहान आहे. असं म्हटलं जातं की ती 'बिल्ली' म्हणूनही ओळखली जाते.
हिंदी कलाविश्वाशी ज्याप्रमाणं दाऊदचं नातं जोडलं गेलं, बरीच माहितीही समोर आली त्याचप्रमाणं पाकिस्तामध्ये गेल्यानंतरही हे सत्र सुरु असल्याचं आता दाऊदच्या या नव्या प्रकरणातून लक्षात येत आहे. २०१९ मध्ये दाऊदनं त्याच्या ताकदीचा वापर करत पाकिस्तानमधील चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या महविशला 'तमगा-ए-इम्तियाज' देऊ केला होता. आजच्या घडीला महविशचा चेहरा लोकप्रियतेच्या शिखरावर असला तरीही काही वर्षांपूर्वी मात्र तिची अशी वेगळी ओळख नव्हती. किंबहुना तिचा या पुरस्कारानं गौरव झाल्यानंतर पाकिस्तानच्या कलाविश्वातून नाराजीचा सूर आळवला गेल्याचंही म्हटलं जातं.
एका आयटम साँगनं सुरुवात करणारी महविश पाहता पाहता कराचीमध्ये असणाऱ्या दाऊदच्या संपर्कात आल्याचं म्हटलं जातं. कराचीमधील मोठ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरच तिच्या वाट्याला अनेक मोठ्या चित्रपटांचे प्रस्तावही आले. पाहता पाहता तिची लोकप्रियता वाढण्यासोबतच देशाच्या राजकीय वर्तुळातही महविशच्या नावाची चर्चा सुरु झाली. सध्या मात्र महविश चर्चेत आहे ते म्हणजे दाऊदशी जोडल्या जाणाऱ्या तिच्या बहुचर्चित नात्यामुळं.