Viral News: कुत्र्याला जीव लावणं जीवावर बेतलं; पिटबुलने अक्षरशः तुकडे तुकडे करुन संपवलं...

Pitbull Dog Attack :  पिट बुल कुत्रे हे सामान्य कुत्र्यांपेक्षा अधिक शक्तीशाली कुत्रे मानले जातात. पिटबुल जातीचे कुत्रे अचानक हिंसक होतात आणि लोकांवर हल्ला करतात. तोंडाला मास लागेपर्यंत ते शांत होत नाहीत. यामुळेच अनेक देशांमध्ये पिट बुल डॉगवर बंदी आहे.   

Updated: Mar 14, 2023, 01:06 PM IST
Viral News: कुत्र्याला जीव लावणं जीवावर बेतलं; पिटबुलने अक्षरशः तुकडे तुकडे करुन संपवलं...  title=

Pitbull Dog Attack : सर्वात इमानदार प्राणी अशी कुत्र्याची ओळख. अनेक जण मोठ्या हौसेने कुत्रे पाळतात त्यांना जीव लावतात. कुत्र्याला जीव लावणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. पिटबुल जातीच्या कुत्र्याने अक्षरशः तुकडे तुकडे करुन महिलेला संपवलं आहे. ब्रिटनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे कुत्र पाळताना दहावेळा विचार करा. 

ब्रिटनच्या प्रेस्टनमध्ये ही थराकाप उडवणारी घटना घडली आहे. एनी शील्ड्स (वय 67 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या 43 वर्षीय मुलीने या प्रकरणाची माहिती दिली.  एनी यांचे प्राण्यांवर खूप प्रेम होते. गार्डन परिसारत वॉक करत असताना एनी यांना हा पिटबुल जातीचा कुत्रा जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यांनी या कुत्र्यावर उपचार केले. यानंतर त्यांनी या कुत्र्याला शेल्टर होममध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, सर्व शेल्टर होम फुल होते. यामुळे त्या या कुत्र्याला आपल्या घरी घेऊन आल्या. 

एनी यांनी या कुत्र्याचे चोकी असे नाव ठेवले. जखमी चोकीची त्यांनी खूप काळजी घेतली त्याच्या सर्व बऱ्या झाल्या.  एनी चोकीला खूप जीव लावत होत्या. पण, प्रेमाच्या बदल्यात चोकीने त्यांना भयानक शिक्षा दिली. अचानक चोकीने त्यांच्यावर हल्ला केला. घरात कुणीच नसताना हा प्रकार घडला. चोकी  अक्षरशः ऐनी यांच्यावर तुटून पडला.  अक्षरशः तुकडे तुकडे करुन त्याने एनी यांना संपवलं. 

एनी यांची मुलगी घरी आली तेव्हा तिला एनी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्या. तर, चोकी याच्या तोंडाला रक्त लागले होते. तो त्यांच्या आसपासच फिरत होता. हे दृष्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ऐनी यांच्या मुलीने पोलिसांना बोलावले. पोलिसांच्या मदतीने या कुत्र्याला जेरबंद करण्यात आले. एनी यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. पिटबुल याच्या हल्ल्यात एनी गंभीर जखमी झाल्या होत्या. 

पिटबुलने तोंडात पकडला 6 वर्षाच्या मुलीचा जबडा

अमेरिकेतही काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती.  पिटबुल जातीच्या कुत्र्याने (Pitbul Dog)  6 वर्षाच्या मुलीचा जबडा तोंडात पकडला. यानंतर तिची कशी बशी सुटका झाली.  1000 टाके घालून डॉक्टरांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करत या चिमुकलीचा जीव वाचवला.