'या' देशात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची प्रचारसभेत हत्या! थरार कॅमेरात कैद; पाहा Video

Presidential Candidate Shot Dead: जाहीर प्रचारसभा सुरु असतानाच हल्ला झाल्यानंतर एकच गोंधळ सुरु झाला. उपस्थित समर्थक मिळेल त्या दिशेने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. समोर आलेल्या माहितीनुसार या नेत्याच्या डोक्यात अगदी पॉइण्ट ब्लँकवरुन गोळी झाडण्यात आली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 10, 2023, 12:45 PM IST
'या' देशात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची प्रचारसभेत हत्या! थरार कॅमेरात कैद; पाहा Video title=
प्रचारसभेदरम्यान घडला हा धक्कादायक प्रकार

Presidential Candidate Shot Dead: दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोअर देशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इक्वाडोअमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रापती निवडणुकीमधील एका उमेदवाराची गोळी मारुन हत्या करण्यात आली. जाहीर सभेमध्ये हा हल्ला झाला. देशाच्या संसदेचे सदस्य आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार फर्नांडो विलानिसेंशियो यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. बुधवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) क्विटो शहरामध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये फर्नांडो सहभागी सहभागी झालेले असतानाच त्यांच्यावर हा हल्ला झाला. फर्नांडो हे एका कारमध्ये बसले होते त्यावेळी हा हल्ला झाल्याचं त्यांच्या टीममधील एका सदस्याने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं. हल्लेखोर गाडीजवळ आला आणि त्याने थेट फर्नांडो यांच्या डोक्यात गोळी झाडली. अगदी पॉइण्ट ब्लँकवरुन गोळी झाडण्यात आली. त्यानंतर अन्य व्यक्तींनीही फर्नांडो यांच्यावर गोळीबार केला. त्यांना एकूण 3 गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले.

तातडीची बैठक

बीसीसीने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. फर्नांडो यांच्यावरील हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना विद्यमान राष्ट्रपती गुइलेर्मो लासो यांनी हल्लेखोरांना सोडणार नाही असं म्हटलं आहे. 'त्यांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेल्या लढ्याचं स्मरण करुन मी तुम्हाला आश्वास देतो की आरोपींना आम्ही सोडणार नाही,' असं लासो म्हणाले. लासो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटरवर) 'संघठित गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. मात्र कायदा त्यांना सोडणार नाही,' असलं म्हटलं आहे. लासो यांनी देशातील उच्चपदस्थ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. लासो यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये देशातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. 

उडाला एकच गोंधळ

फर्नांडो यांच्यावर हल्ला झाला त्यावेळेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर सर्वजण खाली वाकून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अचानक गोळीबार झाल्याने एकच गोंधळ उडतो, आरडाओरड होताना दिसत आहे.

1)

2)

3)

काही दिवसांपूर्वीच मिळालेली धमकी

इक्वाडोअरमध्ये मागील काही काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील महिन्यामध्ये अनेक ठिकाणी हत्यांच्या घटना घडल्या आहेत. लासो यांनी 3 प्रांतामध्ये आपत्काळाची आणि रात्रीच्या कर्फ्यूची घोषणा केली होती. सुरक्षेबरोबरच फर्नांडो यांच्या निवडणुकीचा प्रचारही भ्रष्टाचारमुक्त प्रशासनावर जोर देणारा होता. पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या फर्नांडो यांनी पत्रकारितेच्या कालावधीमध्ये अनेकदा याचा उल्लेख आपल्या वृत्तांकनामध्ये केला. पर्यावरणाला पोहचवली जाणारी हानी कमी करण्याबद्दल ते प्रचारात बोलायचे. मागील आठवड्यांमध्ये त्यांना अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका टोळीनं फर्नांडो यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.