Earthquake : भयंकर! भूकंपानं हादरली धरणी ; भीतीपोटी मोठाल्या इमारती रिकाम्या करत लोक रस्त्यावर

Earthquake  : भूकंपाचे हादरे जाणवण्यास सुरुवात होताच सदर परिसरातील नागरिकांनी बिझनेस पार्क परिसरातील कार्यालयांखाली जमण्यास सुरुवात केली

Updated: Nov 21, 2022, 02:51 PM IST
Earthquake : भयंकर! भूकंपानं हादरली धरणी ; भीतीपोटी मोठाल्या इमारती रिकाम्या करत लोक रस्त्यावर title=
Earthquake in indonesian capital jakarta people got scared

Earthquake : भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये भूकंपाचे सौम्य हादरे जाणवत होते. तोच आता देशाबाहेरही भूकंप झाल्याची माहिती उघड झाली आहे. सोमवारी इंडोनेशियाची (indonesia) राजधानी, जकार्ता (jakarta) येथे सतत काही सेकंदांचे भूकंपाचे हादरे जाणवले. आपल्या परिसरात हादरे बसत असल्याचं पाहून अनेक नागरिकांनी आपआपल्या घरांतून बाहेर धाव मारली. भूकंपामुळे या भागात प्रचंज अशांततेचं वातावरण पाहायला मिळालं. (Earthquake in indonesian capital jakarta people got scared )

दरम्यान, BMKG कडून मिळालेल्या माहितीनुसार हा भूकंप 5.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. त्याचं केंद्र पश्चिम जावातील सियानजुरमध्ये जमिनीच्या पृष्ठापासून 10 किमी अंतर खोलीवर होतं. भूकंप तीव्र स्वरुपाचा नसल्यामुळं त्यापासून त्सुनामीचा धोका संभवत नसल्याचीही माहिती BMKG नं दिली. 

वाचा : बघता बघता मुलगी गायब, अंगावर काटा आणणारा Video

 

भूकंप आला आणि लोकांनी भीतीपोटी हे काय केलं? 

भूकंपाचे हादरे जाणवण्यास सुरुवात होताच सदर परिसरातील नागरिकांनी जकार्ता येथील बिझनेस पार्क परिसरातील कार्यालयांखाली जमण्यास सुरुवात केली. सुदैवानं यामध्ये कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाही. प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून या प्रसंगाविषयी माध्यमांनाही माहिती देण्यात आली. 

मायादिता वालुयो नावाच्या एका वकिलानं त्याबाबत सांगितलं, 'मी काम करत होतो, तोच पायाखालटी जमीन हलू लागली. मला कंपनं जाणवत होती. ती कंपनं अधिक तीव्र होऊ लागलेली.' असं म्हटलं जातं की, इंडोनेशिया पॅसिफिक समुद्रातील 'रिंग ऑफ फायर'वर असल्यामुळं या ठिकाणी सतत भूकंप किंवा ज्वालामुखी उद्रेकाच्या घटना घडतात. या ठिकाणी भूगर्भात असणाऱ्या टेक्टोनिक प्लेट्स वारंवार एकमेकिंवर आदळतात त्यामुळं ही परिस्थिती उदभवते.