डोनाल्ड ट्रंपनी साधला फेसबुकवर निशाणा

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.

Updated: Sep 28, 2017, 10:00 AM IST
डोनाल्ड ट्रंपनी साधला फेसबुकवर निशाणा  title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.

आता त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अमेरिकेतील वृत्तपत्र, न्यूज चॅनल्स आणि फेसबुकवर निशाणा साधला आहे. 

फेसबुक आणि इतर वृत्तसंस्था अ‍ॅन्टी ट्रंप आहेत. त्यामुळे काही खोटी वृत्त पसरतात. यामागे तुमची हातमिळवणी आहे का ? असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला आहे. 

दुसर्‍या एका ट्विटमध्ये ट्रंप यांनी लिहले आहे की, ' पण लोकांचा ट्रंपवर विश्वास आहे. इतर कोणत्याही अमेरिकन राष्ट्रपतीने जे केले नाही ते आम्ही पहिल्या नऊ महिन्यातच करून दाखवले. अर्थव्यवस्था आता चांगल्या स्थितीत आहे.

काही दिवसांपूर्वी रशियन एजंसीने खरेदी केलेल्या अ‍ॅड्सदेखील युजर्सना उपल्ब्ध करण्याचा मानस फेसबुकने व्यक्त केला होता. 

२०१६ सालच्या राष्ट्रपतीच्या निवडणूकांमध्ये रशियाचा किती हस्तक्षेप होता? त्यावेळेस अमेरिकेत सोशल मीडिया आणि इतर वृत्त संस्थांनी हातमिळवणी केली होती का ? याबाबत विचारला केली जात आहे. वृत्त संस्था ट्रंप विरोधात काम करतात असे त्यांनी यापुर्वीही अनेकदा बोलून दाखवले आहे.