चर्चेत तालिबानला ट्रम्प यांनी दिला होता खतरनाक इशारा; म्हणाले इतिहासात आजपर्यंत...

तालिबानशी काय बोलणं झालं होत; डोनाल्ड ट्रंम्प यांनी स्वतःच सांगितलं

Updated: Aug 30, 2021, 01:28 PM IST
चर्चेत तालिबानला ट्रम्प यांनी दिला होता खतरनाक इशारा; म्हणाले इतिहासात आजपर्यंत... title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका रेडिओ कार्यक्रमात स्पष्ट केले की, मागील वर्षी त्यांची तालिबानच्या प्रमखाशी  चर्चा झाली होती. 

हा प्रमुख कोण होता याबाबत स्पष्टपणे तर सांगू शकले नाही. परंतु रेडिओ कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना विचारले की, मुल्ला अब्दुल गनी बरादर बाबत बोलत आहात का? तर ट्रम्प य़ांनी म्हटले की, होय मी त्यांच्याशी बोललो होतो.

ट्रम्प यांनी म्हटले की, अफगानिस्तानशी अमेरिकेच्या सुरक्षादलासंबधी 2020 पासून चर्चा सुरू होती. 

मुल्ला अब्दुल गनी बरादर तालिबानचा सह संस्थापक आणि उपनेता होता. तसेच संघटन नेता हिब्तुल्लाह अखंदजादा आहे.

 तालिबान-ट्रम्प यांच्या बैठकीत काय झालं?
रेडिओ  कार्यक्रमात जेव्हा ट्रम्प विचारण्यात आलं की, मुल्ला बरादरशी काय चर्चा झाली होती? तेव्हा ट्रम्प म्हटले की, मी मुल्ला बरादरला स्पष्ट आणि कडक शब्दात इशारा दिला होता की, जर तालिबानने अमेरिकेला नुकसान पोहचवले तर तालिबानला अशी गंभीर कारवाई करू की आजवरच्या इतिहासात झाली नसेल.

ट्रम्प यांनी सविस्तर बोलताना सुरूवातीला उत्तर कोरियाच्या किम जोंग उनशी झालेल्या चर्चेबद्दल सांगितले.

त्यांनी म्हटले की, 'माझी तालिबानी नेत्यांशी चर्चा निश्चित करण्यात आली. आणि लोक म्हणत होते की तुम्ही असं करू नये. मी उत्तर दिले की, जसे मी उत्तर कोरियाच्या किम जोंग-उनसह चर्चा निश्चित केली होती.आमच्या (अमेरिका-उत्तर कोरिया) मध्ये त्यामुळे अणुयुद्ध झाले नाही. परंतु जर मी राष्ट्राध्यक्ष नसतो तर ओबामांचे म्हणणे खरे झाले असते, आमच्यामध्ये अणुयुद्ध झाले असते.' 

'राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी मला म्हटले होते, आपण उत्तर कोरियाविरोधात अणुयुद्धाकडे जात आहोत. मी विचारले की तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली का? तर त्यांनी नाही असे सांगितले.'

'परंतु हरकत नाही, मला माहित होते की ओबामा उत्तर कोरियाशी चर्चा करू इच्छित होते. परंतु ते चर्चा करण्यास गेले नाही. मला वाटतं की, उत्तर कोरियासुद्धा ओबामांशी चर्चा करू इच्छित नव्हता.'

 

सूत्रसंचलकाने विचारल्यानंतर ट्रम्प यांनी तालिबानच्या बरादरशी चर्चा केल्याचे सांगितले. ज्याला तालिबानचा प्रमुख मानले जात होते. 

तालिबानी नेत्याशी काय चर्चा झाली याबाबत ट्रम्प यांनी म्हटले की, 'आपण दीर्घ चर्चा सुरू करणार (तालिबानशी) आहोत. मी आताच एक स्पष्ट करू इच्छितो की, मी तुमच्या समोर एक गोष्ट पुन्हा बोलणार नाही. जर संयुक्त राज्य अमेरिकेच्या नागरिकांसोबत कोणत्याही प्रकारची हानी पोहचवण्यात आली. किंवा तुम्हा काहीही चुकीचे केल तर लक्षात ठेवा तुमच्यावर अशी कारवाई करेन की जगाच्या इतिहासात आजपर्यंत कोणीही केली नसेल.'

'यानंतर आम्ही विशेष जागा आणि शहरांबाबत चर्चा सुरू केली. मी म्हटले की, आम्ही 21 वर्षानंतर अफगानिस्तान सोडत आहोत. या प्रक्रियेत आम्ही आमचा वेळ घेणार आहोत. आम्ही 1 मे ची तारीख निश्चित केली होती. परंतु त्यांनी अटी शर्थी तोडल्या त्यानंतर आम्ही त्यांच्यावर बॉम्ब टाकायला आणि वेगाने कारवाई केली.'

'यानंतर त्यांनी म्हटले की, आम्ही अमेरिकेच्या शर्थी मान्य करायला तयार आहोत.आम्ही त्यांना पूर्ण नियंत्रणात ठेवले होते. ते काबुलमध्ये नव्हते. तुम्ही आता पाहू शकता की, त्यांनी अफगानिस्तानवर कुठून ताबा मिळवायला सुरूवात केली.  जेथे मी त्यांना सोडलं होतं! मी गेल्याबरोबर ते खुंखार - आक्रमक व्हायला सुरूवात झाली.'

राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाच्या शक्तीचा परिचय
'मला पुन्हा एकादा परिचय झाला की राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळ किती महत्वपूर्ण आणि शक्तिशाली होता. कारण गेल्या काही आठवड्यांपासून वेगाने काही मुर्खपणाचे निर्णय घेतले गेले आहेत.' असेही ट्रम्प यांनी म्हटले.

यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सैन्याला माघारी बोलवण्याच्या निर्णयावर टीका केली होती. त्यांनी म्हटले की, लोकांना काढल्यानंतर आपला गरजेचा सामान अफगानिस्तानातून काढल्यानंतर सैन्याला माघारी येण्याचा परवानगी द्यायला हवी होती. ट्रम्प यांनी म्हटले की, सैन्याचा सामानच 83 अब्ज डॉलरचा होता.

अनेक अमेरिकी माध्यमांनी ट्रम्प यांना सवाल केला की, जर त्यांना बरादरचे नाव माहित नव्हते तर त्यांनी कोणाशी चर्चा केली.