भारत दौऱ्याबाबत फारच उत्सुक - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. 

Updated: Feb 15, 2020, 08:24 AM IST
भारत दौऱ्याबाबत फारच उत्सुक - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याबाबत स्वतः ट्रम्पही फारच उत्सुक आहेत. फेसबुकवर डोनाल्ड ट्रम्प नंबर वन असल्याची पोस्ट पडताच डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच दुसरी पोस्ट टाकली आहे. फेसबुकवर मी नंबर १ वर असेन, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर दोन वर आहेत. मी आता दोन आठवड्यांच्या भारत दौऱ्यावर जात आहे. या भारत दौऱ्याबाबत मी फारच उत्सुक आहे, अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी भारत दौऱ्याबाबतची उत्सूकता बोलवून दाखवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांसोबत बोलताना म्हटलं की, ते भारत दौऱ्याची तयारी करत आहेत. जेथे लाखो लोग त्यांच्या स्वागतासाठी तयार आहेत.

व्हाईट हाऊसने 10 फेब्रुवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांची 24 आणि 25 फेब्रवारी रोजीच्या भारत दौऱ्याची घोषणा केली होती. ट्रंप अहमदाबाद आणि नवी दिल्लीमध्ये राहणार आहेत.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, " ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) माझे मित्र आहेत. ते जबरदस्त व्यक्ती आहेत. मी भारत जाण्याची वाट पाहत आहेत. आम्ही या महिन्याच्या शेवटी भारत दौऱ्यावर जात आहोत." ट्रम्प यांनी म्हटलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, लाखो लोग तुमच्या स्वागतासाठी तयार आहेत.' ही लोकं एअरपोर्टपासून क्रिकेट स्टेडिअमपर्यंत त्यांचं स्वागत करतील.'

ट्रम्प म्हणतात की, "जेव्हा आपल्या येथे 50000 हजार लोकं होते तेव्हा असहज वाटत होतं. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, लाखो लोकं त्यांच्या स्वागतासाठी येणार आहेत. जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअम ते निर्माण करत आहेत. हे जवळपास तयार झालं आहे.'