वॉशिंग्टन : जगातले सध्याचे कट्टर शत्रू म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जाँग ऊन मेच्या अखेरीला भेटणार आहेत.
किम जाँग ऊननं आपला अण्वस्त्र कार्यक्रम स्थगित करण्याचं मान्य केलंय. त्याचप्रमाणे ट्रम्प यांना भेटीचं निमंत्रणही पाठवलंय. अमेरिकन परराष्ट्र खात्यानं हे निमंत्र्ण ट्रम्प यांनी स्विकारल्याची माहिती दिलीय. त्यानुसार किम जॉन ऊननं जर अणू कार्यक्रम खरचं स्थगित केला, तर डोनाल्ड ट्रम्प मे महिन्याच्या शेवटी दोघा शत्रूंची भेट होणार आहे.
दक्षिण कोरियाचे नॅशनल सिक्युरिटी अॅडव्हायजरने दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प-किम यांच्या भेटीबाबत प्योंगयांगवरुन व्हाईट हाऊसला चिठ्ठी लिहिण्यात आली होती जी मंजूर करण्यात आलीये. ट्रम्प आणि किम जोंग यांच्या भेटीसाठीची पहिली अट होती की उत्तर कोरियाने अण्वस्त्र कार्यक्रम रद्द करावा. ही अट किम जोंग यांनी स्वीकारलीये.
डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांची ही भेट ऐतिहासिक मानली जात आहे. ५ मार्चला दक्षिण कोरियाचे १० सदस्यी प्रतिनिधी मंडळ उत्तर कोरियाला गेले होते. यावेळी दक्षिण कोरियाच्या प्रतिनिधी मंडळाची भेट किम जोंग यांच्याशी झाली. या भेटीदरम्यान उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात चर्चा घडवण्याच्या दिशेने मोठे प्रयत्न झाले. या भेटीनंतर किम जोंग यांनी दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना भेटीसाठी तसेच चर्चेसाठी प्योंगयांगला आमंत्रित केले होते.