कॅलिफोर्निया : मासे पाळण्याची आवड अनेकांना असते. तुम्ही इतरांच्या घरी किंवा मत्सालयामध्ये रंगीबेरंगी मासे पाहिले असतील. पण तुम्ही कधी विचार केलाय का की एका माशाचं आयुष्य किती वर्ष असतं? घरी पाळलेल्या माशांचं आयुष्य काही वर्षच असतं. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, गोल्डफिश हा काही दशकं जिवंत राहू शकतो.
पण तुम्हाल माहिती आहे का जगात असाही एक मासा आहे जो अनेक दशकांपासून मत्स्यालयात आहे. हा जगातील सर्वात जुना मासा मानला जातो.
Huff Post मध्ये देण्यात आलेल्या एका बातमीनुसार, या माशाचं नाव मेथुसेलाह (Methuselah) असं आहे. मत्सालयात राहणारी ही सर्वात वृद्ध मासा मानला जातो. हा मासा ताजं अंजीर खातो आणि त्याचा केअरटेकर त्याच्या पोटाला मसाजही करतो. कॅलिफोर्निया अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या जीवशास्त्रज्ञांनी सांगितलं की, मेथुसेलाह 90 वर्षांचा आहे आणि त्याच्या प्रजातीचा इतर कोणताही मासा त्याच्या जिवंत नाही.
मिळालेल्या माहिचीनुसार, मेथुसेलाहची लांबी 4 फूट असून त्याचं वजन सुमारे 18 किलो आहे. मेथुसेलाह ही ऑस्ट्रेलियन लंगफिशची एक जात आहे. या माशाला 1938 मध्ये ऑस्ट्रेलियातून सॅन फ्रान्सिस्को मत्सालयात आणलं होतं.
मेथुसेलाहचे केअरटेकर आणि कॅलिफोर्निया अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे वरिष्ठ जीवशास्त्रज्ञ Allan Jan यांच्या म्हणण्यानुसार, "मेथुसेलाह हा सर्वात जुना मासा आहे. त्याच्या रक्त आणि शरीराच्या चाचण्या अजून झालेल्या नाहीत. यामुळे त्या माशाचं लिंग जाणून घेणं थोडं कठीण आहे. या माशाच्या पंखांचा काही भाग संशोधनासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा विचार सुरु आहे. तर संशोधनानंतर मेथुसेलाहचे वय आणि लिंग दोन्ही कळण्यास मदत होईल."