WHO ने कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सांगितला 'रामबाण' उपाय

युरोपियन कमिशनने आयोजित केलेल्या परिषदेने ७.४ अरब युरो निधी संकलन केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले.

Updated: May 6, 2020, 09:23 AM IST
WHO ने कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सांगितला 'रामबाण' उपाय title=

बीजिंग : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक ट्रेडोस अधनोम घेब्रेरियस यांनी संपूर्ण जगाला एकत्रित होऊन COVID-19 चा पराभव करण्याचे आवाहन केले आहे. एकता ही कोरोना विषाणूचे रामबाण औषध आहे, यावर त्यांनी भर दिला.

ट्रेडोस म्हणाले, कोरोना विषाणू (COVID-19) हा संपूर्ण जगासाठी मिळालेला एक इशारा आहे. त्याचबरोबर एक समान भविष्य घडविण्याची  जगाला एक चांगली संधी आहे. युरोपियन कमिशनने आयोजित केलेल्या कोविड-१९  आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी ७.४ अरब युरो निधी संकलन केल्याबद्दल कौतुक केले.

कोविड-१९चा पराभव करण्याचे मार्ग शोधले पाहिजे. त्यासाठी उपाय-योजना करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.  प्रत्येक मनुष्याचे रक्षण केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेपासून रशियापर्यंत, इस्त्राईलपासून जर्मनीपर्यंत, जगातील सर्व देश सध्या कोरोनाशी सामोरे जाण्यासाठी संजीवनी शोधण्याचा आणि त्याचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु. निराशाजनक बातम्यांच्या प्रकाशझोतात, कोरोनाची संजीवनी रेमेडीव्हिएअर एक आशा म्हणून उदयास आली आहे. बर्‍याच देशांनी असा दावा केला आहे की त्यांनी कोरोना लस बनविली आहे.

कोरोना औषध, डब्ल्यूएचओचा काय आहे दावा ?

क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील रेमेडीव्हिएअरच्या सकारात्मक निकालानंतर आता संपूर्ण जगाचे लक्ष रेमेडिसिव्हियर या औषधावर आहे. तसेच, डब्ल्यूएचओ आपत्कालीन तज्ज्ञ माईक रायन यांनी कबूल केले की, रेमेडीव्हिएअरच्या परिणामामुळे नवीन आशावाद मिळाला आहे.

डब्ल्यूएचओचे आपत्कालीन तज्ज्ञ माइक रायन म्हणतात की "या औषधाच्या वापराविषयी आशादायक चिन्हे आहेत. आम्ही गिलियड इंक आणि अमेरिकन सरकारशी अधिक बोलत आहे. जणेकरुन अधिक उपलब्ध होण्यास मदत होईल.