Devoleena Bhattacharjee seeks help from PM Modi : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही नेहमीच सोशल मीडियावर अनेक गोष्टींवर स्पष्टपणे बोलताना दिसते. आता देवोलीनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचा हात मागितला आहे. देवोलीनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या करण्यात आल्याचं सांगितलं. देवोलीनानं ही पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना देखील टॅग केलं. तिनं तिच्या मित्राचं पार्थिव भारतात परत आणण्यासाठी त्यांच्याकडे मदत मागितली आहे.
देवोलिनाच्या या मित्राचं नाव अमरनाथ घोष आहे. अमरनाथ हा एकटा असून त्याच्या आई-वडिलांचे आधीच निधन झाले आहे. त्यामुळे त्याच्या पार्थिवाला भारतात आणण्यासाठी मदतीची मागणी देवोलीनानं नरेंद्र मोदी आणि त्याचं बरोबर एस जयशंकर यांच्याकडे केलीये. याविषयी तिनं आधीचं ट्विटर म्हणजेच आत्ताच्या X अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
My friend #Amarnathghosh was shot & killed in St louis academy neigbourhood, US on tuesday evening.
Only child in the family, mother died 3 years back. Father passed away during his childhood.
Well the reason , accused details everything are not revealed yet or perhaps no one…
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) March 1, 2024
ही पोस्ट शेअर करत देवोलीना म्हणाली की 'मंगळवारी संध्याकाळी माझा मित्र अमरनाथ घोष याची अमेरिकेतील सेंट लुईस अकॅडमी जवळ गोळी मारून हत्या करण्यात आली. त्याच्या परिवारात इतर कोणीही नसून तो एकटाच आहे. त्याच्या आईचे तीन वर्षांपूर्वीच निधन झाले तर त्याच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते. काही मित्रांना सोडल्यास त्याच्या कुटुंबात कोणीही नाही, जो त्याच्यासाठी उभा राहू शकेल किंवा त्याच्यासोबत घडलेल्या या गोष्टीवर प्रश्न विचारेल. तो कोलकाताचा राहणार होता. तो एक अप्रतिम डान्सर होता आणि त्यातच तो पीएचडीच शिक्षणही घेत होता. तो संध्याकाळी जेव्हा वॉकला गेला तेव्हा ही सगळी घटना घडली, अचानक एक अनोळखी व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने त्याला गोळी झाडली. अमेरिकेतील आमचे काही मित्र त्याचं पार्थिव शरीर इथे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अजूनही त्याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, अजूनही त्याच्या कोणत्याही आरोपी विषयी देखील काहीही माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा : VIDEO : अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगसाठी 'या' आलिशान टेन्टमध्ये राहणार आहेत सेलिब्रिटी
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत मूळ भारताचे असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांवर हल्ला होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या महिन्यातच वॉशिंग्टनमध्ये असलेल्या एका हॉटेलच्या बाहेर एका मूळच्या भारतीय असलेल्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती.