दरवाजा उघडल्या उघडल्या Delivery Boy नं केलं KISS, नंतर झालं असं की...

CCTV Captured Kiss: डिलिव्हरी बॉयनं घराचा दरवाजा उघडताच किस केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपास सुरु केला आहे. 

Updated: Nov 24, 2022, 03:55 PM IST
दरवाजा उघडल्या उघडल्या Delivery Boy नं केलं KISS, नंतर झालं असं की... title=

Delivery Man Attempted To Kiss: आपल्या आसपास रोज अनेक घटना घडत असतात. काही घटनांचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. काही घटनांबाबत वाचलं की तळपायाची आग मस्तकात जाते. अशीच काहीशी घटना ब्रिटन शहरात घडली आहे. एका डिलिव्हरी बॉयनं केलेलं कृत्य वाचून तुम्हीही हैराण व्हाल. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात आपण प्रत्येक गोष्ट ऑनलाईन सर्च करत असतो आणि मागवतो देखील. जेवणाची ऑर्डर देखील ऑनलाईन मागवली जाते. काही मिनिटांमध्ये डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन दारात हजर राहतो. असाच एक डिलिव्हरी घेऊन व्यक्ती दारात आला आणि दरवाजा उघडल्या उघडल्या महिलेला किस करू लागला. तरुणी घरात एकटीच असल्याचा फायदा घेत डिलिव्हरी बॉयनं जबरदस्तीने चुंबन घेण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कृत्यामुळे महिलेला धक्का बसला. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नवरा घरी आल्यानंतर जोडप्याने फुटेज पाहिले आणि घटनेची तक्रार करण्याचे ठरविले. 

घटनेनंतर कंपनीने कामावरून काढलं

महिलेच्या घटनेनंतर डिलिव्हरी कंपनी सदर डिलिव्हरी बॉयला कामावरून काढून टाकलं आहे. डिलिव्हरी बॉय मध्यमवयीन असून टेस्को कंपनीत कामाला होता. तक्रार करताना महिलेने सीसीटीव्ही फुटेज अटॅच केली आहे. यानंतर कंपनीने डिलिव्हरी बॉयला निष्कासित केलं. यानंतर कंपनीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

बातमी वाचा- Boyfriend ला केलेला फोन दुसऱ्या महिलेनं उचलला, Girlfriend नं केलं असं की...

पोलिसात केली तक्रार

रिपोर्ट्समध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, महिलेच्या तक्रारीनंतर टेस्कोने आपल्या डिलिव्हरी बॉयच्या कृत्याबद्दल महिलेची माफी मागितली आहे. दुसरीकडे, कंपनीनंतर महिलेनेही पोलिसात तक्रार दाखल केली असून आता पोलिसही या घटनेचा तपास करत आहेत. त्याचबरोबर या घटनेबाबत सोशल मीडियावर कंपनीविरोधात लोकांनी संताप व्यक्त केला आहे.