कोरोना वॅक्सीन घेणाऱ्या जगातील पहिल्या पुरुषाचा मृत्यू, इतर आजाराने मृत्यू

जगात सर्वात आधी ज्या पुरुषाने कोरोना वॅक्सीन घेतली त्यांचा मृत्यू झाला आहे. 

Updated: May 26, 2021, 08:50 AM IST
कोरोना वॅक्सीन घेणाऱ्या जगातील पहिल्या पुरुषाचा मृत्यू, इतर आजाराने मृत्यू title=

मुंबई : जगात सर्वात आधी फायझर बायएनटेक लस (Pfizer-Biontech Jab) घेणाऱ्या एका व्यक्तीचा 'असंबंधित' आजाराने मृत्यू झाला आहे. 81 वर्षीय बिल शेक्सपियर (Bill Shakespeare)यांनी 90 वर्षीय  मारग्रेट कीनन यांच्यानंतर डिसेंबर महिन्यात पहिली लस घेतली. त्यांनी यूनिवर्सिटी हॉस्पिटल कोवेंट्रीमध्ये पहिली लस घेतली. शेक्सपियर यांचा मित्र जेन इनेन्स यांनी सांगितलं की, 'शेक्सपियर यांचं गुरूवारी निधन झालं. 
शेक्सपियरने रोल्स रॉयसमध्ये काम करत होते. ते एक पॅरिश सल्लागार होते.'

शिवाय शेक्सपियर यांनी तीन दशकांहून अधिक काळ एलेस्लमध्ये आपल्या स्थानिक समुदायाची सेवा केली. इनेस यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'बिल यांनी अनेक गोष्टींसाठी लक्षात ठेवले जाईल, कोवेंट्रीमधून असल्यामुळे त्यांना गर्व होता. त्यांनी एलेस्ले प्राइमरी आणि कॉनडन कोर्ट शाळेत गव्हर्नरच्या रूपात काम केलं आहे. '

वेस्ट मिडलँड्स लेबर ग्रुपने ट्विटरवर म्हटले आहे की कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणारे बिल पहिले पुरूष होते. त्यामुळे त्यांची जगभरात चर्चा होती.  कोरोना वॅक्सीन घेणे हीच ८१ वर्षाच्या शेक्सपिअर यांना खरी श्रद्धांजली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाचं लसीकरण एकमेव पर्याय आहे. 

सांगायचं झालं तर, उत्तर आयर्लंडमध्ये राहणाऱ्या 90 वर्षीय  मारग्रेट कीनन (Margaret Keenan) पहिल्या व्यक्ती आहेत ज्यांना कोरोना व्हायरसची लस देण्यात आली आहे. कोरोना वॅक्सीनच्या चाचणीनंतर पहिली लस घेणारी व्यक्ती म्हणजे मारग्रेट कीनन . मारग्रेट कीनन यांनी इंग्लंडच्या स्थनिक रूग्णालयात लस घेतली.