वॉटरपार्कला जाऊन मज्जा करणं लोकांच्या जीवावर बेतलं, उंच स्लाईड तुटली आणि... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

पाण्यात उड्या मारणे, स्लाइड्सवरुन खेळणे असं सगळं आपण तेथे गेल्यावर करतो आणि जीवनाचा मनसोक्त आनंद घेतो.

Updated: May 13, 2022, 01:42 PM IST
वॉटरपार्कला जाऊन मज्जा करणं लोकांच्या जीवावर बेतलं, उंच स्लाईड तुटली आणि... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा title=

मुंबई : आयुष्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही. त्यामुळेच बरेच लोक असं म्हणतात की, आजच्या दिवस मोकळेपणाने जगून घ्या, उद्या काय होईल याचा नेम नाही. असे अपघात सहसा तेव्हाच होतात, परंतु हे अपघात अशा ठिकाणीही होऊ शकतात, जेथे आपण त्याची अपेक्षा करत नाही. अशीच एक घटना घडली आहे. ज्याचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो लोकांच्या अंगावर काटा आणत आहे.

वॉटर पार्कला लोक मजा-मस्ती करण्यासाठी जातात. पाण्यात उड्या मारणे, स्लाइड्सवरुन खेळणे असं सगळं आपण तेथे गेल्यावर करतो आणि जीवनाचा मनसोक्त आनंद घेतो. बऱ्याचदा तरुणा आणि लहान मंडळी येथे जास्त उपस्थीती लावतात. कारण त्यांना उंचच उंच घसरगुंडीवरुन थरार अनुभवायचा असतो.

असाच थरार वॉटरपार्कमध्ये अनुभवणं अनेकांच्या जीवावर बेतलं आहे.

खरंतर व्हायर होणाला हा व्हिडीओ इंडोनेशियातील केनपार्क वॉटरपार्कचा आहे. जिथे अचानक वॉटर स्लाईड फुटली आणि वरून बरेच लोक थेट खाली पडले. या अपघातात 16 जण स्लाईडवरून पडून गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात कसा झाला?

इंडोनेशियन मीडिया एजन्सी अंतराने दिलेल्या वृत्तानुसार, स्लाईडवरून लोक खाली येत असताना ही भीषण दुर्घटना घडली. लोक स्लाईडवर असताना अचानक मधूनच वॉटर स्लाइड तुटली. स्लाईड तुटल्याने सुमारे 16 जणं या अपघातात बळी पडले आणि या सर्वांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडीओ फेसबुकवर NOODOU नावाच्या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये लोक वॉटर स्लाइडवरून खाली पडताना स्पष्ट दिसत आहेत. वृत्तानुसार, वॉटर स्लाइड तुटण्याचे कारण स्लाइडच्या काठावर एक क्रॅक होते. त्यानंतर स्लाइडवरील ओव्हरलोडिंगमुळे ते तुटले आणि हा अपघात झाला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा भयानक व्हिडीओ ७ मेचा आहे. जो सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वॉटर पार्कच्या देखभालीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.