दिवसभराचा थकवा संपवणारा व्हिडिओ... चिमुरड्यानं आपल्या मित्रासोबत काय केलं हे पाहून तुम्ही ही रोखू शकणार नाही तुमचं हसू

सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ अनेकांचं मन जिंकत आहे.

Updated: Jul 8, 2022, 07:41 PM IST
दिवसभराचा थकवा संपवणारा व्हिडिओ... चिमुरड्यानं आपल्या मित्रासोबत काय केलं हे पाहून तुम्ही ही रोखू शकणार नाही तुमचं हसू title=

मुंबई - लहान मुलं फार गोंडस आणि निरागस असतात. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आपलं मन प्रसन्न करतात. ते जे काही करतात ते पाहून चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं. त्यामुळे सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ अनेकांचं मन जिंकत आहे.

जय वीरुची ही खास जोडी
लहान मुलं आणि कुत्रा यांचामधील घट्ट मैत्रीचे आपण अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. असाच एक जय वीरुचा व्हिडीओ यूजर्सचं लक्ष वेधतं आहे. हा चिमुरड्या खेळत असताना त्याने जे काही केलं ते पाहून दिल खूश होऊन जातं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @photographclub_animals

किती निरागसपणे या चिमुरड्याने कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या खेळात सहभागी करुन घेतलं. या कुत्र्याच्या पिल्लाला स्लाईडवर चढण्याला त्रास होत होता. तर या चिमुरड्याने त्याला मागून धक्का त्याला वर चढण्यासाठी मदत केली आणि त्याला स्लाईडचा आनंद मिळवून देण्यात मदत केली.

 

खरंच... आयुष्यातही गोष्टी आपण येवढ्याच मोकळ्यापणे जगू शकलो असतो, तर आयुष्य किती सुंदर झालं असतं.