'या' देशात मिळतोय दणदणीत पगार; भारताला यादीत कितवं स्थान? विचारही केला नसेल

Salary News : ज्यावेळी आपण एखाद्या नोकरीच्या निमित्तानं काही नव्या संस्थांमध्ये मुलाखती देतो तेव्हा एकाच महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होतात. तो मुद्दा म्हणजे पगार.   

सायली पाटील | Updated: Aug 19, 2023, 01:20 PM IST
'या' देशात मिळतोय दणदणीत पगार; भारताला यादीत कितवं स्थान? विचारही केला नसेल   title=
Countries with highest Salary package where india stands

Salary News : नोकरदार वर्गासाठी नोकरी कशीही असो, पण त्यातून महिन्याकाठी मिळणारा पगारच खूप काही सांगून जातो. याच पगारातून अनेक गरजा भागवल्या जातात. काहींना ध्येय्यपूर्तीसारीठीसुद्धा हीच रक्कम मदत करते. नोकरी बदलण्याचा मुद्दा येतो तेव्हाही पगाराची गणितं तितक्याच लक्षपूर्वकपणे मांडली जातात. मागील काही वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये (Economy) झालेले बदल पाहता पगाराचे आकडेही चांगलेच वाढले आहेत. तुम्हाला माहितीये का जगातील कोणत्या देशात सर्वाधिक पगार दिला जातो? 

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण पगाराच्या बाबतीत (Salary) अमेरिका आणि युरोपातील मोठ्या विकसित देशांऐवजी जगातील काही लहान राष्ट्रांनी बाजी मारली आहे. जागतीक अर्थव्यवस्थेत आघाडीवर असणाऱ्या अमेरिकेहूनही जास्त पगार एका देशात मिळत असून, अमेरिकेला यादीतील पहिल्या तीन देशांमध्येही हे स्थान मिळालेलं नाही. (jobs abroad)

World of Statistics च्या माहितीनुसार मासिक (Monthly salary) सरासरी वेतनाच्या बाबतीत युरोपातील स्वित्झर्लंडनं बाजी मारली आहे. इथं नोकरदारांना एका महिन्याला साधारण 6 हजार 298 डॉलर म्हणजेच जवळपास 5 लाख 21 हजार 894 रुपये इतका पगार आहे. त्यामागोमाग येणारं नाव म्हणजे लक्जमबर्ग. इथं नोकरी करणाऱ्यांना सरासरी 5 हजार 122 डॉलर इतका पगार मिळतो. तर, तिसऱ्या स्थानावर सिंगापूर या आशियाई देशाचा समावेश असून, इथं महिन्याला सरासरी 4 हजार 990 डॉलर इतका पगार मिळतो. 

अमेरिकेचं स्थान घसरलं... 

जगातीव विकसित देशांची अर्थव्यवस्था भक्कम असली तरीही यापैकी कोणत्याही देशाला पहिल्या तीन स्थानांमध्येही बाजी मारता आलेली नाही. कारण, अमेरिकासुद्धा या यादीत चौथ्या स्थानावर आहे. इथं मासिक वेतन 4 हजार 664 डॉलर म्हणजेच 3 लाख 86 हजार 497 रुपये इतकं आहे. त्याखालोखाल पहिल्या दहा देशांमध्ये पाचव्या स्थानी आहे आईसलँड. इथं नोकरी करणाऱ्यांना 4 हजार 383 डॉलर इतका पगार मिळतो. 

हेसुद्धा वाचा : मुलांना दूध-बिस्कीट खायला देताय का? आताच थांबवा ही सवय 

सहाव्या स्थानावर कतारचं नाव असून, इथं महिन्याला सरासरी 4 हजार 147 डॉलर इतका पगार मिळतो. तर, सरासरी 3 हजार 570 डॉलर पगारासह डेन्मार्क यादीत सातव्या स्थानावर आहे. त्याखालोखाल नेदरलँड्स (3 हजार 550 डॉलर पगार), नवव्या स्थानी युएई (3 हजार 511 डॉलर पगार) आणि दहाव्या स्थानावर नॉर्वेचा (3 हजार 510 डॉलर पगार) समावेश आहे. 

भारताचं स्थान बरंच मागे... 

World of Statistics च्या निरीक्षणानुसार सर्वाधिक पगार देणाऱ्या देशांच्या यादीत भारत 64 व्या स्थानी असून इथं सरासरी पगार 594 डॉलर म्हणजेच 49  हजार 227 रुपये इतकाच आहे. तर शेजारी राष्ट्र पाकिस्तानात सरासरी पगार  159 डॉलर म्हणजेच साधारण 13,175 रुपये आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मासिक पगाराच्या बाबतीत चीन आणि दक्षिण आफ्रिकेत भारताहून दुपटीनं पगार दिला जातो. थोडक्यात आंतरराष्ट्रीय स्तराव एखाद्या देशात नोकरीची संधी शोधत असाल, तर नेमकं कोणत्या देशाचा पर्याय निवडायचाय हे तुमच्या लक्षात आलं असेलच.