Coronavirus : चीनमध्ये कोरोनाने हाहाकार, मृत्यूचा आकडा भयावह; तर दररोज 9000 बळी...

Corona in China:  चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू होत असल्याचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.  

Updated: Jan 1, 2023, 01:28 PM IST
Coronavirus : चीनमध्ये कोरोनाने हाहाकार, मृत्यूचा आकडा भयावह; तर दररोज 9000 बळी...  title=

Corona Update : चीनमध्ये कोरोना (china corona) कहर केला असताना BF.7 (BF.7) या उप-प्रकारामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेत XBB.1.5 या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. परिणामी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाने टेन्शन वाढवले आहे. भारतावर कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे चिंता वाढली आहे.  

एअरफिनिटी संस्थेच्या अहवालानुसार, चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.  तसेच या अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे की, चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्येच कोविड संसर्ग वेगाने पसरू लागला होता. या रिपोर्टनुसार, चीनमध्ये दररोज नऊ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.    

तसेच या अहवालाच्या मते डिसेंबरमध्ये 1.86 कोटी कोविड संसर्गासह एकूण मृत्यूंची संख्या किमान 1 लाख असू शकते.  तसेच  जानेवारीच्या मध्यापर्यंत एका दिवसात 37 लाख कोविड प्रकरणे असू शकतात. त्याच वेळी, 23 जानेवारीपर्यंत चीनमध्ये एकूण 5,84,000 लोकांचा मृत्यू होऊ शकतो. असा अंदाज  ब्रिटनमधील (UK) संशोधन संस्था एअरफिनिटी रिसर्च फर्मने मांडला आहे. 

वाचा :  भारताला मोठा धक्का! ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर? 'या' 3 मधून कोण होणार विकेटकीपर? 

कोविड डेटावरील टीकेच्या दरम्यान, चिनी अधिकार्‍यांनी कोविड परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अधिकार्‍यांसह बैठक घेतली. एका ऑनलाइन बैठकीत, जागतिक आरोग्य संघटनेने चीनला अनुवांशिक अनुक्रम, हॉस्पिटलायझेशन, मृत्यू आणि लसीकरणाविषयी अधिक आणि अचूक डेटा प्रदान करण्यास सांगितले. 

चीनमध्ये कोनाचं थैमान

तर दुसरीकडे चीनमध्ये कोनानं थैमान घातले आहे.कोरोनाच्या नव्या लाटेत लाखो नागरिकांचा मृत्यू होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.नव्या वर्षात चीनमध्ये कोरोनाच्या अनेक लाटा येतील आणि रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. चीनसाठी हा अत्यंत कठीण काळ आहे अशी भावना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यक्त केली आहे.