कोरोनाशी लढण्यासाठी कोकणी माणूस मैदानात, आयर्लंडच्या पंतप्रधानांचे रुग्णांवर उपचार

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जगात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.

Updated: Apr 6, 2020, 11:11 PM IST
कोरोनाशी लढण्यासाठी कोकणी माणूस मैदानात, आयर्लंडच्या पंतप्रधानांचे रुग्णांवर उपचार title=

मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जगात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी मूळचे कोकणातले असलेले आयर्लंडचे पंतप्रधान मैदानात उतरले आहेत. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर राजकारणात येण्याच्याआधी डॉक्टर होते. आता लिओ वराडकर आयर्लंडमधल्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणार आहेत.

आयर्लंडमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे, त्यामुळे जे नागरिक सध्या आरोग्य सेवा देत नाहीयेत, त्यांनी आरोग्य सेवा देण्यासाठी पुन्हा एकदा स्वत:चं नाव नोंदणीकृत करावं, असं आवाहन आयर्लंडच्या आरोग्य मंत्रालयाने केलं आहे.

४१ वर्षांच्या लिओ वराडकर यांचे वडिल भारतीय डॉक्टर तर आई आयर्लंडमध्ये नर्स होत्या. आयर्लंडच्या नागरिकांसाठी त्यांचे पंतप्रधान आपल्या जुन्या डॉक्टरी पेशात आले आहेत. देशाच्या आरोग्य सेवेसाठी वराडकर यांनी पुन्हा एकदा आपलं नाव नोंदवून घेतलं आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी लिओ वराडकर आठवड्यात एका शिफ्टमध्ये काम करणार आहेत.

राजकारणात यायच्याआधी लिओ वराडकर यांनी ७ वर्ष डॉक्टर कार्यरत होते. डबलिनच्या सेंट जोन्स हॉस्पिटलमध्ये आणि कोनोली हॉस्पिटलमध्ये ते ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करत होते. आपण स्वत: पेशाने डॉक्टर असल्यामुळे या कठीण काळात रुग्ण सेवा करण्याची संधी द्यावी, असा प्रस्ताव लिओ वराडकर यांनी ठेवला होता. 

डॉक्टर असल्यामुळे लिओ वराडकर कोरोनाग्रस्त नागरिकांना फोनवर सल्ले देणार आहेत. आयर्लंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजारापर्यंत पोहोचली आहे, तर १५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.