Video: मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत 'ही' कामं

Corona in China :  चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. बीजिंगनंतर शंघाई आणि अनसन सारख्या शहरांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिघडू लागली आहे. शंघाई या शहरातून आलेली मृत्यदेहाचे फोटोसमोर आले आहेत. ते पाहून सर्वांचे थरकाप उडणारी आहे.

Updated: Dec 28, 2022, 02:45 PM IST
Video: मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत 'ही' कामं   title=
china situation in shanghani and ansan very worst video viral

Coronavirus in China: गेल्या काही दिवसांपासून चीनसह अन्य देशातही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे जगभर पुन्हा एकदा चिंत व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत. परिणामी चीनमधील (corona china) परिस्थिती इतकी गंभीर आहे की मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत आहे. त्यासाठी तब्बल 101 किलोमीटरच्या रांगा लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

दरम्यान कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोविडशी संबंधित डेटा आणि माहिती लपवण्यासाठी चीन सतत नवनवीन डावपेच चालवत आहे. चीनने दावा केला आहे की, गेल्या 6 दिवसांपासून कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. पण चीनमधून जे व्हिडिओ (video viral) समोर येत आहेत ते वेगळेच सांगत आहेत.

मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी चीनच्या शंघाई (Shanghai) शहराचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये शंघाई शहरातील रुग्णालयात मृतदेहांचे ढीग दिसत आहेत. त्यांच्या मते हा व्हिडिओ 24 डिसेंबरचा आहे. याचदरम्यान चीनमधील अनसान शहराचाही थरकाप उडवणारा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी खूप प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोनामुळे सतत होत असलेल्या मृत्यूमुळे अंत्यसंस्कार गृहाच्या पार्किंगमध्ये मृतदेह ठेवण्यात येत आहेत.

स्मशानभूमीत भरती सुरू

चीनमधील शंघाई (Shanghai) शहरात कोरोनाचा कहर सुरू असल्यामुळे येथे कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तर काही नागरिकांना कोरोनामुळे आपला जीवही गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीत शंघाईच्या (Shanghai) शांघायच्या स्मशानभूमीत भरती सुरू आहे. जे लोक मृतदेह उचलू शकतात ते यासाठी अर्ज करू शकतात. एवढेच नाही तर ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना प्राधान्य दिले जात आहे.

चीन माहिती लपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

कोरोनाशी संबंधित मृत्यूची आकडेवारी जगासमोर येऊ नये, यासाठी चीन जोरदार प्रयत्न करत आहे. फॉर्मवर स्वाक्षरी करूनच लोकांना त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह रुग्णालयातून दिले जात आहेत. यामध्ये लोकांना त्यांच्या नातेवाईकांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याचे लेखी द्यावे लागेल. जर काही चुकीचा दावा असेल तर त्याला मी जबाबदार आहे.

वाचा : टेन्शन वाढवणारी बातमी, भारतात परतलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह 

या सगळ्या दरम्यान बीजिंगच्या अंत्यसंस्कार गृहाला पाठवलेल्या नोटिसीची प्रत समोर आली आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की, अंत्यसंस्कार गृहातील कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणत्याही माध्यम संस्थेला मुलाखत देण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच कोणताही डेटा शेअर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

चीनमध्ये 20 दिवसांत 25 कोटी प्रकरणे - अहवाल

चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. येथे गेल्या 20 दिवसांत 25 कोटी (250 दशलक्ष) लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सरकारी कागदपत्रे लीक झाल्यानंतर हा खुलासा झाला आहे. रेडिओ फ्री एशियाने सोशल मीडियावर सुरू असलेल्या कागदपत्रांचा हवाला देत म्हटले आहे- महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 'झिरो-कोविड पॉलिसी'मध्ये सूट दिल्यानंतर परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 20 दिवस, संपूर्ण चीनमध्ये सुमारे 250 दशलक्ष लोक कोविड-19 मुळे प्रभावित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या बैठकीत संसर्गाशी संबंधित डेटा सादर करण्यात आला. ही बैठक केवळ 20 मिनिटे चालली आणि आता त्याची कागदपत्रे लीक झाली आहेत. आकडेवारीनुसार, 1 ते 20 डिसेंबर दरम्यान, 248 दशलक्ष लोकांना कोविड-19 ची लागण झाली, जी चीनच्या लोकसंख्येच्या 17.65 टक्के आहे.

चीनने निर्बंध हटवले

चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत. चीनने 8 जानेवारीपासून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमधून सूट जाहीर केली आहे. एवढेच नाही तर चीन आपल्या आंतरराष्ट्रीय सीमाही उघडणार आहे. 2020 पासून सुमारे 3 वर्षांनी चीनला आंतरराष्ट्रीय अलग ठेवण्याच्या नियमांतून सूट मिळणार आहे. यापूर्वी चीनने डिसेंबरमध्येच वादग्रस्त कोविड धोरण मागे घेण्याची घोषणा केली होती. याला मोठा विरोध झाला. चीनमध्ये कोविड धोरण मागे घेतल्यानंतर प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.