अमेरिकेत कोरोनाचे तांडव सुरुच, पुढील दोन आठवड्याचे प्रचंड दडपण

अमेरिकेत कोरोनाचा वेग प्रचंड वाढतोय. अमेरिकेत  ३ हजार ४१५ बळी गेले आहेत. 

Updated: Apr 1, 2020, 12:59 PM IST
अमेरिकेत कोरोनाचे तांडव सुरुच, पुढील दोन आठवड्याचे प्रचंड दडपण title=

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाचा वेग प्रचंड वाढतोय. अमेरिकेत  ३ हजार ४१५ बळी गेले आहेत. चीनलाही मागे टाकले आहे. चीनचा जीवघेणा कोरोना तब्बल १८३ देशांमध्ये पसरला. नव्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत ३ हजार ४१५ जणांचा बळी घेतला आहे. चीनमध्ये ३ हजार ३०९ जणांचा बळी गेलाय.  

अमेरिकेत कोरोनाने कहर केला आहे. अमेरिकेसाठी पुढील दोन आठवडे अत्यंत महत्वाचे असल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. येणाऱ्या काळात अमेरिकेत कोरोनाचा फैलाव अतिशय वेगाने होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा १ ते २ लाखांच्या घरात जाण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचनाही नागरिकांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या आहेत. येणारे दोन आठवडे अमेरिकेसाठी अतिशय महत्त्वाचं आहेत. हा काळ अमेरिकन नागरिकांसाठी अत्यंत कठीण काळ असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांनी अधिक सतर्कतेने राहण्याचे, आवाहन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जनतेला केले आहे. आतापर्यंत अमेरिकेत तीन हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेलाय. तर १ लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.