डेल्टा व्हेरिएंटमुळे वाढली चिंता, WHO ने दिला धोक्याचा इशारा

WHOच्या महासंचालकांनी यासंदर्भात इशारा दिला आहे. डेल्टा हा अधिक धोकादायक आणि वेगानं पसरणारा असल्याचंही ते यावेळी सूचित करायला विसरले नाहीत. 

Updated: Jul 3, 2021, 07:30 PM IST
डेल्टा व्हेरिएंटमुळे वाढली चिंता, WHO ने दिला धोक्याचा इशारा title=

मुंबई: जगभरात कोरोनाचं थैमान थांबण्याचं नाव घेत नाही. त्यामध्ये डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटनं आता टेन्शन वाढवलं आहे. या व्हेरियंटसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली असून धोक्याचा इशारा दिला आहे. जगभरात कोव्हिडची आलेली लाट ही चिंताजन आहेच पण त्यातही आता डेल्टा व्हेरिएन्टमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. 

कोरोनाचे विषाणू काळानुसार सतत बदलत आहेत. डेल्टासारखे रुप तर अधिक धोकादायक असल्याचा इशाराचा जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे महासंचालक  टेड्रोस अदहानोम गेब्रेयेसस यांनी दिला आहे. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फायझर आणि जॉनसन आणि जॉन्सनची लस डेल्टा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी आहे असा दावा केला जात आहे. 

जगभरात लसीकरण मोहीम अजूनही पूर्ण झाली नाही. अनेक भागांमध्ये लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. WHOच्या महासंचालकांनी यासंदर्भात इशारा दिला आहे. डेल्टा हा अधिक धोकादायक आणि वेगानं पसरणारा असल्याचंही ते यावेळी सूचित करायला विसरले नाहीत. 

ज्या देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आहेत त्यांना अधिक धोका आहे. कोणताच देशाला धोका कमी नाही. कोरोनाचं रुप बदलणारं आहे त्यामुळे ते अधिक धोक्याचं असल्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना हलगर्जीपणा न करण्याचं आवाहनही दिलं आहे. 

डेल्टा प्लस व्हेरियंट हे WHO साठी चिंतेचा विषय नाही असं महत्त्वाचं विधान वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट हा प्रकाराने संक्रमित रुग्णांची संख्या सध्यातरी कमी आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने हा विषय चिंतेचा नाही असं स्पष्टीकरण सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं आहे.