Inhaled Corona Vaccine: कोरोनाशी लढण्यासाठी चीनचे मोठे शस्त्र, ही लस बाजारात दाखल

Corona Virus:  नेजल या इनहेल व्हॅक्सिन तयार केली असून तिचे नाव Ad5-nCoV लस आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासही मान्यता देण्यात आली आहे. या लसीचा वास घेऊन कोरोनाशी लढा दिला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

Updated: Sep 6, 2022, 08:47 AM IST
Inhaled Corona Vaccine:  कोरोनाशी लढण्यासाठी चीनचे मोठे शस्त्र, ही लस बाजारात दाखल title=

बीजिंग : Corona Virus: चीनने कोरोनासाठी जगातील पहिली लस  बनवलेली आहे. नेजल या इनहेल व्हॅक्सिन तयार केली असून तिचे नाव Ad5-nCoV लस आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासही मान्यता देण्यात आली आहे. या लसीचा वास घेऊन कोरोनाशी लढा दिला जाऊ शकतो, असा दावा चिनी तज्ज्ञांनी केला आहे.

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. कोरोना रोखण्यासाठी तिथल्या सरकारला काही शहरांमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा लागला आहे.  झिरो कोविड धोरणांतर्गत अनेक ठिकाणी लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. 

चीनने कोरोनासाठी जगातील पहिली नाक किंवा इनहेलेशन लस विकसित केली आहे. Cansino च्या Ad5-nCoV लसीच्या आणीबाणीच्या वापरासाठी चीनलाही मान्यता मिळाली आहे. ही लस नाकाने श्वास घेतल्यास कोरोनापासून बचाव होऊ शकतो, असा दावा चिनी तज्ज्ञांनी केला आहे.

प्रभावाच्याबाबतीत तिसऱ्या क्रमांकावर 

 स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या कॅन्सिनो बायोलॉजिक्स इंकने कोरोनाची अनुनासिक लस तयार करण्याचा पराक्रम केला आहे. आता चीन सरकारनेही त्याचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. ही लस बनवणाऱ्या कंपनीच्या मते, ही लस कोरोनाची लक्षणे रोखण्यासाठी 66 टक्के आणि गंभीर आजारांवर 91 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. परिणामकारकतेच्याबाबतीत, ते चीनच्या सिनोव्हॅक बायोटेक लिमिटेड आणि सरकारी मालकीच्या सिनोफार्म ग्रुप कंपनीच्या लसींच्या मागे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आता इतर देशांमध्ये या लसीची मागणी  

जर आपण या लसीच्या पहिल्या आवृत्तीबद्दल बोललो तर मार्च 2020 मध्ये त्याची चाचणी मानवांवर सुरु झाली. फेब्रुवारी 2021 मध्ये, ती चीन तसेच मेक्सिको, पाकिस्तान, मलेशिया आणि हंगेरीमध्ये वापरले गेली. कंपनीचा दावा आहे की Ad5-nCoV लस सेल्युलर प्रतिकारशक्ती वाढवते. हे ट्रामस्क्यूलर इंजेक्शनशिवाय सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी म्यूकोसल प्रतिकारशक्ती वाढवून देखील कार्य करते.

एक आठवडाभर सुरक्षित  

चीन व्यतिरिक्त आता इतर देशांतील कंपन्या देखील लोकांना कोविड-19 विषाणूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नाकाद्वारे घेण्यात येणाऱ्या लसवर काम करत आहेत. अँटीबॉडीजवर परिणाम करणाऱ्या लस बनवण्यात गुंतल्या आहेत. या प्रकारच्या लसीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते अधिक लोकांना आकर्षित करेल. कारण ते इंजेक्शन फ्री आहे, असे बरेच लोक आहेत जे इंजेक्शन घेण्यास घाबरतात आणि त्यांना फक्त यामुळेच कोरोनाची लस मिळत नाही. अशा लोकांसाठी ही लस प्रभावी ठरेल.