Corona Vaccine for Children : लहान मुलांसाठी कोरोनाची लस, WHOची भारताच्या या लसीला मान्यता

Corona Vaccine for Children: कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोन सगळ्यांसाठी घातक ठरत आहे.  

Updated: Dec 18, 2021, 09:41 AM IST
Corona Vaccine for Children : लहान मुलांसाठी कोरोनाची लस, WHOची भारताच्या या लसीला मान्यता   title=

मुंबई : Corona Vaccine for Children: कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोन सगळ्यांसाठी घातक ठरत आहे. लहान मुलांनाही ओमायक्रोनचा धोका आहे. आता लहान मुलांसाठी लसही बाजारात आली आहे. मात्र, त्याला मान्यता मिळाली नव्हती. परंतु लहान मुलांना कोरोनाची लस मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने शुक्रवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII), Covovax येथे बनवलेल्या लसीला मुलांवर आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली. WHO ने कोरोना विषाणूविरूद्ध मान्यता दिलेली ही जगातील नववी लस आहे. SII नोव्हॉवॅक्सच्या परवान्याखाली ही लस तयार करेल.

आदर पूनावाला यांनी व्यक्त केला आनंद 

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला  (Adar Poonawalla) यांनी WHO च्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. पूनावाला यांनी ट्विट केले की, 'कोरोनाविरुद्धच्या आमच्या लढ्यात हा आणखी एक मैलाचा दगड आहे. चाचणीमध्ये, कोवोव्हॅक्सने अचूकता आणि सुरक्षिततेमध्ये उत्कृष्ट परिणाम दिले. आपल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार.

लस 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सक्षम

सिरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) या लसीच्या निर्मितीसाठी नोव्हावॅक्स, डब्ल्यूएचओ आणि गवी यांच्याशी करार केला आहे. पूनावाला यांनी या आठवड्यात सांगितले की SII पुढील 6 महिन्यांत मुलांसाठी कोरोना लस Covovax लाँच करणार आहे. त्यांनी दावा केला की कोवोव्हॅक्सन लस 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनापासून वाचवण्यास सक्षम असल्याचे आढळून आले आहे.

मुलांना कोरोनापासून संरक्षण मिळेल

सध्या लोकांना देण्यात येत असलेल्या कोविशील्ड, कोवॅक्सीन, स्पुटनिक आणि इतर कोरोना लस 18 वर्षांपर्यंतच्या लोकांना विषाणूपासून वाचवण्यात सक्षम आहेत. पूनावाला म्हणतात की, त्यांची नवीन लस मुलांना संसर्गजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी एक उत्तम ढाल सिद्ध होईल.

चाचणीत लस सुरक्षित  

WHO नुसार, Covovax सध्या आपत्कालीन वापर सूची (EUL) श्रेणीमध्ये मंजूर करण्यात आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या तपासणी अहवालानंतर त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे. या अहवालात नवीन लस मुलांसाठी सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.