कर्मचाऱ्यांची धावत येण्याची सवय मोडून काढण्यासाठी कंपनीने लढवली शक्कल...

प्रत्येक ऑफिसचे काही नियम असतात आणि या नियमांचं पालन करण्याची कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा असते. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 12, 2017, 09:30 PM IST
कर्मचाऱ्यांची धावत येण्याची सवय मोडून काढण्यासाठी कंपनीने लढवली शक्कल...  title=

मुंबई : प्रत्येक ऑफिसचे काही नियम असतात आणि या नियमांचं पालन करण्याची कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा असते.  पण वारंवार सांगूनही काही कर्मचारी ऐकत नाहीत. नियम असतातच मोडण्यासाठी असं बोलून  नियम सर्रास मोडले जातात. मेनचेस्टरमधल्या 'कासा सेरॅमिका' या कंपनीने कर्मचाऱ्यांची एक वाईट सवय मोडण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली आहे. मुख्य दरवाज्यापासून आत येताना काही कर्मचारी तसेच कार्यालयाला भेट देणारे इतरही लोक धावत आत येतात. अनेक्दा सांगूनही ते ऐकत नाही. तेव्हा मुख्य दारापासून आतील रस्त्यापर्यंतच्या भागात कंपनीने टाईल्स बसवल्या आहेत.

या टाईल्सची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात खड्डा पडला आहे असा भास होईल आणि खड्डा चुकवण्यासाठी तो हळूहळू चालेल.  ऑप्टिकल इल्यूशन तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारचा भास कंपनीने तयार केला आहे. याआधीही अनेक देशांत रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि गाड्यांचा वेग कमी करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूशन तंत्राचा वापर करण्यात आला होता.