Galwan Clash | चीनची पोलखोल, गलवान चकमकीत मोठं नुकसान

2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत चीन सांगतोय त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान झाल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे.   

Updated: Feb 3, 2022, 11:14 PM IST
Galwan Clash | चीनची पोलखोल, गलवान चकमकीत मोठं नुकसान title=

मुंबई :  2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत चीन सांगतोय त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान झाल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या 'द क्लॅक्सन' या वृत्तपत्रानं एक बातमी दिलीये. चीन केवळ 4 सैनिक मारले गेल्याचं सांगत असला तरी त्यापेक्षा 9 ते 10 पट जास्त सैनिक या चकमकीत मारले गेल्याचं या वृत्तात म्हटलंय. (china suffered higher losses than reported in galwan clash as per the klaxon) 

'द क्लॅक्सन'च्या बातमीला चीनमधील ब्लॉगर्स आणि तिथल्या बेनामी शोधकर्त्यांचा हवाला देण्यात आलाय. अनेक चिनी लोकांकडून माहिती मागवण्यात आलीये. त्यानुसार चीनचे 35 ते 40 सैनिक गलवान नदीच्या थंडगार पाण्यात वाहून गेल्याचं समोर आलंय.

या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीननं आपलं काहीच नुकसान झालं नसल्याचा दावा केला होता. हा दावा खरा मानून देशांतर्गतही सरकारवर टीका झाली होती. द क्लॅक्सनच्या वृत्तामुळे टीकाकारांनाही चपराक बसली आहे.

सीमेवर भारताच्या कुरापती काढणारा चीन अनेकदा खोट्या बातम्या पेरून दुस-या राष्ट्रांचं मानसिक खच्चीकरण करू पाहतो...मात्र या वृत्तामुळे अपप्रचार करणारा चीन पुन्हा एकदा तोंडघशी पडलाय.