कोरोनामुळे चीनची चांदी; चार अब्ज मास्कची विक्री

कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे.

Updated: Apr 6, 2020, 09:18 AM IST
कोरोनामुळे चीनची चांदी; चार अब्ज मास्कची विक्री title=

मुंबई : मार्च महिन्यापासून जवळपास चार अब्ज मुखवटे परदेशात विकल्याचा दावा चीनने रविवारी केला आहे. यावरून वैद्यकीय निर्यातीच्या गुणवत्तेवर त्यांनी व्यापक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचं जाळ जगभरात पसरलं आहे. 

चीनमध्ये आता कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या घटत आहे. असं असताना बिजिंगमधील फॅक्टरींमधून वैद्यकीय पुरवठ्यांचे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहित केले जात आहे. कारण जागतिक स्तरावर साथीचा रोग असलेला कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे. आतापर्यंत देशभरात ६०हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. 

चीनने आतापर्यंत १ मार्चपासून ३.८६ बिलियन म्हणजे ३ अब्ज ८६ कोटी मास्क, ३७.५ मिलियन वैद्यकीय कपडे, १६ हजार व्हेंटिलेटर आणि २.८४ मिलियन COVID-19 विषाणूची चाचणी करणारं कीट निर्यात केले आहेत. अधिकारी जीन हे ने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ५० हून अधिक देशांत याची निर्यात करण्यात आली. तसेच निर्यात केलेल्या या वैद्यकीय गोष्टींची किंमत हे जवलपास १०.२ बिलियन युवान म्हणजे १.४ बिलियन डॉलर आहे. असं असलं तरी नेदरलँड्स, फिलिपाईन्स, क्रोएशिया, तुर्की आणि स्पेनसह असंख्य राष्ट्रांनी चीनमधील कमी दर्जाची किंवा सदोष वैद्यकीय उत्पादनांची तक्रार केली आहे.

गेल्या आठवड्यात, डच सरकारने गुणवत्ते चांगले नसल्यामुळे १.३ दशलक्षच्या चीनी मालमत्तेपैकी ६ लाख मुखवटे परत मागितले.स्पेनने देखील टेस्ट किड नाकारले असून त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.