मुंबई : चीनमध्ये एका माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचा धक्कादयक प्रकार उघडकीस आला आहे. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी चीनमधील जिआंगसु भागात बर्ड फ्लूचे H10N3 स्ट्रेनसोबत एका व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली आहे. झेंजियांग शहरात 41 वर्षीय एका व्यक्तीमध्ये बर्ड फ्लू स्ट्रेन सापडला. पण सध्या ती व्यक्ती स्थिर आहे.
चीनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूग्णाला 28 मे रोजी H10N3 एवियन इन्फ्लूएंजा व्हायरसची लागण झाल्याचं समजलं. या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण कशी झाली? याचा शोध घेतला जात आहे. तसेच वैश्विक स्तरावर H10N3 ची लागण मानवाला झाली आहे? याचा देशील शोध घेतला जात आहे.
बर्ड फ्लू ज्याला एव्हीयन इन्फ्लूएंझा असं म्हटलं जातं. हा रोग बहुतांश वेळेला पक्ष्यांमध्ये आढळतो. मात्र, इतर प्राणी तसेच माणसांना संक्रमित करण्याची क्षमता या विषाणूमध्ये निश्चितच आहे. पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर मारणाऱ्या विषाणूचा H5N1 हा स्ट्रेन कॉमन आहे.
अर्थातच कोरोनामुळे आता तुम्हाला विषाणू, त्याचा स्ट्रेन, त्याचा प्रकार या सामान्य बाबी आता समजल्याच असतील. जसा कोरोनाचा नवा स्ट्रेन सध्या धुमाकूळ घालतो आहे, अगदी तसेच बर्ड फ्लूच्या विषाणूचे देखील इतर अनेक स्ट्रेन आहेत. जसे की H5N7 आणि H5N8 असे.
हा देखील संसर्गजन्य तसेच जीवघेणा आहे. हा व्हायरस सर्वांत आधी गीस या पक्ष्यामध्ये आढळला. चीनमध्येच हा विषाणू आढलला आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा विषाणू आणि हा रोग जगभरात सापडत गेला. भारतामध्ये हा विषाणू पहिल्यांदा महाराष्ट्रात सापडला होता.
2006 मध्ये नंदूरबारमध्ये याची पक्ष्यांना लागण झाली होती. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये आढळलेल्या पक्ष्यांच्या शरिरामध्ये H5N8 हा स्ट्रेन सापडला आहे तर हिमाचल प्रदेशातील पक्ष्यांच्या चाचणीमध्ये H5N1 हा विषाणू सापडला आहे.