बिजिंग: विमान अपघाताच्या बातमीधील सर्वात मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या भीषण अपघातात वैमानिकासह 132 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ईस्टर्न एअरलाईन्सच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये वैमानिकसह 132 प्रवासी होती. मात्र कोणीच वाचू शकलं नाही.
या विमान अपघाताचे भयंकर फोटोही समोर आले होते. DNA द्वारे आतापर्यंत 120 प्रवाशांची ओळख पटवण्यात अधिकाऱ्यांना यश आलं आहे. मात्र अजूनही तपास सुरू आहे.
दक्षिण-पश्चिम चीनच्या कुनमिंग शहरात सोमवारी 29,000 फूट उंचावरून विमान जात होतं. विमान लॅण्ड होण्याआधी त्याचा भीषण अपघात झाला. हे विमान डोंगर असलेल्या ठिकाणी कोसळल्याची माहिती मिळाली होती. शनिवारी दुर्घटनास्थळावरून विमानाचे अवशेष, मृतदेह ताब्यात घेण्यात आले.
तर ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अजूनही काही अवशेष मिळणं बाकी असल्याचं सांगितलं जात आहे. ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याचं कारण अद्याप समोर आलं नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अचानक वैमानिकांचा संपर्क तुटला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फॉरेंसिक आणि DNA रिपोर्टच्या मदतीने 114 हून अधिक प्रवाशांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेनंतर विमान कंपनीने उर्वरित विमान सेवा काही काळासाठी खंडित केली आहे.