चंद्रावरील पाण्याचा पृथ्वीशी आहे थेट संबंध, चांद्रयान-1 च्या डेटामधून झाला मोठा खुलासा

Chandrayaan-1: चंद्र हा विविध रहस्यांनी भरलेला आहे. चंद्रावर पाणी आहे का याचा शोध जगभरातील शास्त्रज्ञांकडून केला जात आहे. अलीकडेच चांद्रयान-१च्या डेटातून नवीन खुलासा करण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 15, 2023, 04:26 PM IST
चंद्रावरील पाण्याचा पृथ्वीशी आहे थेट संबंध, चांद्रयान-1 च्या डेटामधून झाला मोठा खुलासा title=
Chandrayaan1 data Earths electrons may have formed water on Moon

Chandrayaan-1: चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षितरित्या लँड झाले आहे. चांद्रयान-3 लँड झाल्यानंतर १४ दिवस विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागाचा व वातावरणाचा अभ्यास केला होता. आता चंद्रावर 14 दिवसांसाठी रात्र आहे. त्यामुळं विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर स्लीप मोडवर आहेत. अशातच चांद्रयान-१ मोहिमेतून मोठा खुलासा करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी चांद्रयान-१ने चंद्रावर पाणी शोधलं होतं. त्यानंतर आता चंद्रावर पाणी कुठून आलं याचा खुलासा करण्यात आला आहे. 

पृथ्वीमुळंच चंद्रावर पाणी बनलं होतं. कारण याठिकाणाहून जाणारी हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी बनण्यास मदत करते, असा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील मनोवास्थित हवाई विद्यापिठाच्या वैज्ञानिकांनी हा खुलासा केला आहे. धरतीच्या चोहूबाजूंनी प्लाझ्माची एक शीट आहे. त्यामुळं चंद्रावरील दगड वितळतात किंवा तुटतात त्यातून खनिज निर्माण होतात किंवा बाहेर येते. याशिवाय चंद्राच्या पृष्ठभागावरील हवामानातही सतत बदल होत असतात. इलेक्ट्रॉन्समुळं चंद्राच्या पृष्ठभगावर पाणी तयार होतंय. चंद्रावर पाणी कुठे आहे, हे शोधणं कठिण आहे. चंद्रवर असलेल्या पाण्याचा स्त्रोताचे कारण समजत नाहीये, असा दावा नेटर एस्ट्रोनॉमी जर्नलमध्ये करण्यात आला आहे. 

चंद्रावर पाणी कुठे व कसं मिळेल हे कळल्यास किंवा पाणी किती लवकर बनवण्यात येईल, याचा शोध लागल्यास भविष्यात मानव चंद्रावर घर वसवू शकतो. चांद्रयान- १ने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे अस्तित्व शोधून काढले होते. दरम्यान, चंद्र आणि पृथ्वी दोघेही सौर वाऱ्याच्या परिघात आहेत. सौर वाऱ्यामध्ये हाय एनर्जीचे कण असतात प्रोटॉन, इलेक्ट्रॉन इत्यादी आढळून येतात. ते चंद्राच्या पृष्ठभागावर हल्ला करतात. त्यामुळंच चंद्रावर पाणी तयार होते, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. 

चंद्रावरील बदलत्या हवामानामागील कारण हे सौर वारा जेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून जातो तेव्हा तो चंद्राचे रक्षण करतो. परंतु, सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या फॉटोनपासून चंद्राचे संरक्षण करणे पृथ्वीला शक्य होत नाही. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या किंवा मॅग्नेटोटेलच्या बाहेर असतो तेव्हा सूर्याच्या उष्ण वाऱ्यांचा त्याच्यावर जास्त प्रमाणात हल्ला होतो. जेव्हा ते मॅग्नेटोटेलच्या आत असतं तेव्हा त्यावर सौर वाऱ्यांचा क्वचितच हल्ला होतो. अशा स्थितीत पाणी तयार होण्याची प्रक्रिया थांबते. पृथ्वीच्या मॅग्नेटोटेलमुळे, चंद्रावर पाणी तयार होण्याची प्रक्रिया वेगवान किंवा मंद होते. याचा अर्थ चंद्रावर पाणी तयार होण्याच्या प्रक्रियेत मॅग्नेटोटेलचा थेट सहभाग नाही. पण त्याचा खोलवर परिणाम होतो, असं संशोधक शुई ली यांनी सांगितलं. शुई ली यांनी 2008 ते 2009 या कालावधीतील चांद्रयान-१च्या डेटाचे निरीक्षण केले आहे.