Virginia Democratic Livestreamed Sex Act: अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील हाऊस ऑफ डेलिगेट्सच्या निवडणुकीसाठी एका महिला उमेदवाराने फारच विचित्र कृत्य केलं आहे. या महिला उमेदवाराने आपल्या पतीबरोबर सेक्स करतानाचा व्हिडीओ लाइव्ह स्ट्रीम केला आणि तो पाहणाऱ्या व्हर्ल्यूअल ऑडियन्सकडे काही टीप्स असतील तर द्या अशी विचित्र मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे कृत्य करणाऱ्या महिलेचं नाव सुसाना गिब्सन असं आहे. सुसाना ही 2 मुलांची आई आहे. सुसाना सध्या रिचमंड येथील डिस्ट्रीक्ट 57 च्या लोकप्रतिनिधी पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत. एका सेक्स व्हिडीओ लाइव्ह स्ट्रीम करणाऱ्या वेबसाईटवरुन सुसानाने पतीबरोबरचा हा अश्लील व्हिडीओ लाइव्ह केला.
40 वर्षीय सुसाना ही पेशाने नर्स आहे. या ऑनलाइन वेबसाईटवर तिने यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारे पतीबरोबर लैंगिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये अपलोड केलेले स्वत:चे असले व्हिडीओ सुसानाने उमेदवारी घोषित केल्यानंतर सार्वजनिकरित्या जारी केल्याची माहितीही समोर येत आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतरही सुसाना या वेबसाईटवर पतीबरोबरचे अश्लील व्हिडीओ लाइव्ह स्ट्रीम करते. तिने या वेबसाईटवर आपला एक फोटोही नुकताच अपलोड केल्याचं वृत्त न्यू यॉर्क पोस्टने दिलं आहे. सुसानाच्या या अकाऊंटला 5770 फॉलोअर्स आहेत. आपण या माध्यमातून चांगल्या हेतूने पैसे गोळा करत असल्याचा सुसानाचा दावा आहे. त्यामुळेच तिला या वेबसाईटवरुन अशा अश्लील व्हिडीओंसाठी पैसेही मिळतात. तिने या वेबसाईटवरील काही व्हिडीओंमध्ये मी आणि माझ्या पतीने पार्टनर स्वॅपिंग म्हणजेच वेगळ्या जोडीदाराबरोबर संबंध ठेवण्याचे प्रयोगही केल्याचं म्हटलं आहे.
सुसानाच्या वेबसाईटवर तिच्याबद्दलची माहिती देताना, "पत्नी, 2 मुलांची आई, नर्स, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ असून अनेक वर्षांपासून विशेष रुग्णांची सेवा करण्याचा अनुभव आहे," असं लिहिलेलं आहे. सुसानाचा जन्मही व्हर्जेनियामध्येच झाला आहे. तिने व्हर्जेनिया आणि कोलंबिया विद्यापीठामधून शिक्षण पूर्ण केलं. सुसानाचे पती पेशाने वकील आहे. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुसानाने अशाप्रकारे माझ्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करुन मला आणि माझ्या कुटुंबाला अपमानित करण्याचा हेतू असल्याची पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
"या प्रकरणामुळे मी शांत बसेल असं वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. माझे राजकीय विरोधक आणि रिपब्लिकन पाठराख्यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी सेक्स क्राइम करण्यासही तयार आहेत. महिला जेव्हा त्यांचा आवाज उठवतात तेव्हा तो चिरडण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात," असं सुसाना यांनी म्हटलं आहे.